Advertisement

लवकरच शिक्षकही करणार लोकल प्रवास?

अद्याप लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू झालेली नाही. परंतू लवकरत लोकलनं शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना प्रवासाची मुभा मिळण्याची शक्यता आहे.

लवकरच शिक्षकही करणार लोकल प्रवास?
SHARES

कोरोनामुळं बंद असलेली मुंबईची लाइफलाइन लोकल सेवा जून महिन्यात पुन्हा रुळावर आली. सुरूवातील केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी धावणारी लोकल आता बॅंक कर्मचारी, खासगी सुरक्षारक्षक, महिला यांसह अनेक प्रवाशांना घेऊन प्रवास करत आहे. मात्र, अद्याप लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू झालेली नाही. परंतू लवकरत लोकलनं शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना प्रवासाची मुभा मिळण्याची शक्यता आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी बंद ठेवण्यात आलेली शाळा आता पुन्हा सुरू करण्यात येत आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांची शाळा सुरू होण्याची प्रतिक्षा संपुष्टात येणार आहे. मात्र, या शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या शिक्षकांना शाळेत जायचं कसं हा प्रश्न सतावत आहे. त्यामुळं शाळेत हजर राहता यावं यासाठी त्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यासंदर्भात राज्य सरकारनं मध्य व पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना पत्र लिहिलं आहे.

शाळांमध्ये ५० टक्के उपस्थिती आणि २३ नोव्हेंबरपासून ९वी ते १२वीचे वर्ग प्रत्यक्षात सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भात राज्य सरकारनं मध्य व पश्चिम रेल्वे प्रशासनाला पत्र लिहून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची प्रवासाची गैरसाय होऊ नये म्हणून त्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्याची विनंती केली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा