मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी खूषखबर !

 Mumbai
मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी खूषखबर !
Mumbai  -  

मुंबई - मुबंईहून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. ही बाब लक्षात घेत कोकण रेल्वेने प्रवाशांसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी दरम्यान विकेंड स्पेशल गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी (01167) ही गाडी शनिवारी 25 मार्च रोजी लोकमान्य टिळक टर्मिनसहून सकाळी 5.30 वाजता सुटणार आहे. तर त्याच दिवशी ती गाडी सावंतवाडीला दुपारी 3 वाजता पोहचणार आहे. तसेच परतीच्या प्रवाशांसाठी रविवारी 26 मार्च रोजी सावंतवाडी ते लोकमान्य टिळक टर्मिनस (01168) ही गाडी सावंतवाडीहून सकाळी 11.15 वाजता सुटणार असून त्याचदिवशी लोकमान्य टिळक टर्मिनसला रात्री 11.45 वाजता पोहचणार. या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, मानगाव, खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर रोड, कनकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे.

Loading Comments