Advertisement

मुंबई-जयपूर दरम्यान स्पाइसजेटची सेवा सुरू

जेट एअरवेजची सेवा बंद झाल्यामुळे मुंबई ते जयपूर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काही दिवसांपासून गैरसोयीला सामोरं जावं लागत होतं. या मार्गावरील संधी हेरून इंडिगो एअरलाइन्स आणि स्पाइसजेट या दोन कंपन्यांनी मुंबई ते जयपूर दरम्यान नवी सेवा सुरू केली आहे.

मुंबई-जयपूर दरम्यान स्पाइसजेटची सेवा सुरू
SHARES

जेट एअरवेजची सेवा बंद झाल्यामुळे मुंबई ते जयपूर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काही दिवसांपासून गैरसोयीला सामोरं जावं लागत होतं. या मार्गावरील संधी हेरून इंडिगो एअरलाइन्स आणि स्पाइसजेट या दोन कंपन्यांनी मुंबई ते जयपूर दरम्यान नवी सेवा सुरू केली आहे.

बुधवारपासून सेवा सुरू

इंडिगो एअरलाइन्सने जयपूरहून मुंबईसाठी २ फ्लाइट सुरू केल्या असून एक फ्लाइट येत्या बुधवारपासून सुरू होणार आहे. सोबतच इंडिगो एअरलाइन्स दिल्ली ते कोलकाता दरम्यान देखील एक फ्लाइट सुरू करणार आहे. 

स्पाइसजेटने मुंबई- जयपूर दरम्यान नवी सेवा बुधवारपासून सुरू केली आहे. मुंबईहून सायंकाळी ६.४५ वाजता निघणारं विमान जयपूरला रात्री ८.२५ वाजता पोहोचेल. तर जयपूरहून रात्री ८.५५ वाजता निघणारं विमान रात्री ११.१० वाजता पोहोचेल.

प्रवाशांची सोय 

जेट एअरवेजची सेवा बंद झाल्याने मुंबई, चंदीगढ, इंदौर, वडोदर इ. शहरांतील विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत होती. मात्र इंडिगोची सेवा या मार्गावर सुरू झाल्याने येथील विमान प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.हेेही वाचा-

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे २ तासांसाठी बंद

दिल्ली-मुंबईदरम्यान धावणार हायस्पीड वंदे भारत ट्रेनRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा