Advertisement

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे २ तासांसाठी बंद

वाहतूक नियम तसंच रस्ते सुरक्षेसंदर्भात जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा महामंडळा (MSRDC)तर्फे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर ओव्हरहेड ग्रँटी बसवण्यात येणार आहे. या कामाकरीता मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे गुरूवार दुपार १२ ते २ दरम्यान बंद राहणार आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे २ तासांसाठी बंद
SHARES

वाहतूक नियम तसंच रस्ते सुरक्षेसंदर्भात जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा महामंडळा (MSRDC)तर्फे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर ओव्हरहेड ग्रँटी बसवण्यात येणार आहे. या कामाकरीता मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे गुरूवार दुपार १२ ते २ दरम्यान बंद राहणार आहे. 


पुण्याकडून मुंबईकडे

या २ तासांमध्ये पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. वाहन चालकांच्या सोईसाठी पुण्याहून मुंबईकडे येणारी हलकी वाहने किवळे पूल इथून जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून वळवण्यात येतील. तर जड वाहने उर्से टोलनाका परिसरातच थांबवण्यात येतील. त्यामुळे जड वाहतुकदारांना २ तास एकाच जागी थांबून राहावं लागेल. 


या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून 'एक्स्प्रेस वे'वरील पोलिसांची संख्या वाढविण्यात आली आहे. या वेळेत मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक नेहमीनुसार सुरू राहील, अशी माहिती महामार्ग पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते यांनी सांगितलं.

 

काय आहे ओव्हरहेड ग्रँटी?

वाहनचालक, प्रवासी यांची रस्ते सुरक्षा, वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करण्यासाठी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर 'ओव्हरहेड  ग्रँटी' उभारण्यात येणार आहे. डिजिटल पद्धतीचे साइन बोर्ड तसंच जाहिरातीच्या होर्डिंगद्वारे ही जनजागृती केली जाईल.  



हेही वाचा-

मुंबई विमानतळावर जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांचं जोरदार आंदोलन

एमएमआरडीए हटवणार २१ पुलांवरील जाहिरातींचे होर्डिंग्ज



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा