Advertisement

एसटी-शिवशाहीत टक्कर, 40 जखमी

गुरुवारी सकाळी 9.30 वाजेच्यादरम्यान अलिबागमधील कार्लेखिंड या ठिकाणी एसटी आणि शिवशाही या गाड्या समोरासमोर येत होत्या. तेव्हा समोरील टमटमला ओव्हरटेक करत असताना दोन्ही गाड्या एकमेकांवर आदळल्यामुळे अपघात झाला.

एसटी-शिवशाहीत टक्कर, 40 जखमी
SHARES

अलिबागमध्ये शिवशाही आणि एसटी बस अपघातात 40 जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी 9.30 च्या दरम्यान घडली. यामध्ये दोन्ही बसच्या चालकांची प्रकृती गंभीर असून त्या दोघांना मुंबईतील जेजे रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे.

दोन्ही गाड्यांची समोरासमोर टक्कर झाल्याने एसटी बसचा दर्शनी भाग पूर्णपणे चक्काचूर झाला.


कसा झाला अपघात?

गुरुवारी सकाळी 9.30 वाजेच्यादरम्यान अलिबागमधील कार्लेखिंड या ठिकाणी एसटी आणि शिवशाही या गाड्या समोरासमोर येत होत्या. तेव्हा समोरील टमटमला ओव्हरटेक करत असताना एकमेकांवर आदळल्यामुळे हा अपघात झाला.


चालकांची प्रकृती गंभीर

यापैकी एसटी बस ही पनवेलहून अलिबागकडे तर शिवशाही मुरुड-स्वारगेट या मार्गावर होती. या अपघातात अलिबाग आगारचे एसटीचे चालक एस. के. लाहाने आणि शिवशाही चे चालक एस एन सैयद यांची प्रकृती गांभीर असून त्यांना मुंबईच्या जेजे रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. इतर प्रवशांना अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा