Advertisement

एसटी धावणार, पण तुम्हाला प्रवास करता येणार का? वाचा सविस्तर

राज्यात कडक नियमावलीही तयार करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्यानं सार्वजनिक आणि खासगी प्रवासी वाहतुकीबद्दल कडक नियम लागू करण्यात आले आहेत. त्यात आता एसटी महामंडळासाठी एक नियमावली जाहीर केली आहे.

एसटी धावणार, पण तुम्हाला प्रवास करता येणार का? वाचा सविस्तर
SHARES

राज्यात कडक नियमावलीही तयार करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्यानं सार्वजनिक आणि खासगी प्रवासी वाहतुकीबद्दल कडक नियम लागू करण्यात आले आहेत. त्यात आता एसटी महामंडळासाठी एक नियमावली जाहीर केली आहे.

एसटी नियमावली

  • एसटी बस मधून फक्त आपत्कालीन कर्मचारी प्रवास करणार
  • एसटी महामंडळाच्या १६००० गाड्यांपैकी स्थानिक पातळीवरील डेपो मॅनेजर निर्णय घेऊन ५० टक्के गाड्या रस्त्यावर उतरणार
  • डॉक्टर / पॅरामेडिकल /प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ रुग्णालय आणि वैद्यकीय चिकित्सालयातील अधिकारी- कर्मचारी  यांनाच त्यांच्या वैद्यकीय संस्थेने दिलेल्या ओळखपत्राच्या आधारे तिकीट देण्यात येईल.
  • कोणतीही व्यक्ती  ज्याला वैद्यकीय उपचाराची गरज आहे, किंवा अपंग व्यक्ती आणि त्यांच्या मदतीला एक अतिरिक्त व्यक्ती प्रवास करता येईल

आंतरजिल्हा किंवा आंतरशहर प्रवासासाठी खासगी बसगाड्यांसाठी नियंत्रणे

  • बससेवा देणाऱ्यांनी एका शहरात फक्त दोन ठिकाणी गाडी थांबा ठेवावा आणि त्याचे वेळापत्रक तसेच थांबा याची माहिती स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला द्यावी.
  • गरज भासल्यास स्थानिक आपत्ती व्यवस्थापन अधिकारी त्यात बदल सुचवू शकतील.
  • सर्व थांब्यांवर उतरणाऱ्या प्रवाशांना १४ दिवस गृहविलगीकरणाचा ठळक शिक्का हातावर मारून घ्यावा लागेल आणि हे शिक्का मारायचे काम बस कंपनीने करायचे आहे.
  • थर्मल स्कॅनरचा उपयोग करण्यात येईल आणि जर कोणत्याही व्यक्तीत लक्षणे आढळून आल्यास त्यांना कोरोना केअर सेंटर (सीसीसी) किंवा रुग्णालयात पाठविण्यात येईल
Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा