सर्वोच्च न्यायालयाकडूनही मेट्रो - 3 ला हिरवा कंदील

  Goregaon East
  सर्वोच्च न्यायालयाकडूनही मेट्रो - 3 ला हिरवा कंदील
  मुंबई  -  

  मेट्रो - 3 मधील झाडांच्या कत्तलीविरोधातील अपीलावर गुरूवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवत झाडांच्या कत्तलीवरील स्थगिती उठवत अपील निकाली काढल्याची माहिती 'मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशन'च्या प्रवक्त्याने दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे मेट्रो - 3 चा मार्ग आता मोकळा झाल्याचे म्हटले जात आहे.

  झाडांच्या कत्तलीविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या निना वर्मा यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयानेही मेट्रो - 3 ला हिरवा कंदील दिला आहे. मात्र त्याचवेळी उच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या समितीकडे तक्रार करावी आणि आपले प्रश्न मार्गी लावावे, असेही नमूद केल्याची माहिती याचिकाकर्त्यांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता याचिकाकर्ते या समितीकडेही दाद मागण्याची शक्यता आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.