कोकण रेल्वेला प्रभू पावले

 Mumbai
कोकण रेल्वेला प्रभू पावले
कोकण रेल्वेला प्रभू पावले
See all
Mumbai  -  

कोकण रेल्वे मार्गावर लवकरच कायापालट होणार आहे. कोकण रेल्वे चाकरमान्यांचा त्रासदायक प्रवास आता सुखकर होणार आहे. कारण रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी चार हजार कोटींच्या कामांना मंजूरी दिल्याची माहिती कोकण रेल्वेचे अध्यक्ष संजय गुप्ता यांनी नुकतीच दिली.
खडतर मार्गावर धावणारी कोकण रेल्वे आता विकसीत मार्गावर धावणार आहे. कारण संपूर्ण कोकण रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण होणार आहे. त्यासाठी दहा हजारांपैकी चार हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आल्यामुळे सध्या कोकण रेल्वेवरील गाड्यांची होणारी रखडपट्टी थांबणार आहे.
दुहेरीकरण आणि विद्युतीकरणासोबतच कोकण रेल्वेवर नवीन 11 स्थानके उभारण्यात येत आहेत. त्यामुळे प्रवासी सुविधांसोबतच कोकण रेल्वेला याचे आणखी काही महत्वाचे फायदे होणार आहेत. या स्थानकांमध्ये रेल्वे क्रॉसिंग तयार करण्यात येणार असल्याने कोकण रेल्वेचा प्रवास अधिक गतिमान होण्यास मदत होणार असल्याचा दावा कोकण रेल्वेकडून करण्यात येत आहे. 

कोकण रेल्वे मार्गावर नव्याने 11 स्थानके उभारली जात असून, यामध्ये महाराष्ट्रात रायगडमध्ये 3, रत्नागिरीमध्ये 4 आणि सिंधुदुर्गात 2 स्थानकांचा समावेश आहे. रायगड जिल्ह्यात इंदापूर, गोरेगाव रोड, सावे ब्राह्मणे, रत्नागिरी जिल्ह्यात कडवई, कलंबणी, पोमेंडी व वेरवली, तर सिंधुदुर्गातील खारेपाटण, आचिर्णे या स्थानकांचा समावेश आहे.
सध्या कोकण रेल्वे मार्गावर दुहेरीकरण नसल्याने एखाद्या एक्स्प्रेस गाडीला पुढे जायचे असल्यास समोरून येणाऱ्या किंवा पुढे धावणाऱ्या गाडीला जवळच्या स्थानकात थांबविले जाते. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना उशिर होतो. त्यामुळे नवीन स्थानकांमध्ये क्रॉसिंग लाईन तयार केल्यास काही प्रमाणात ही संख्या वाढून रखडपट्टी कमी होणार असल्याची माहिती कोकण रेल्वेचे अध्यक्ष संजय गुप्ता यांनी दिली.

असा होणार कोकण रेल्वेचा विकास

  • रोहा-वीर मार्गाचं दुपदरीकरण
  • नवीन रेल्वे स्थानकांची निर्मिती
  • पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा चिपळूण-कराड हा नवा मार्ग उभारण्यात येणार आहे
  • संपूर्ण कोकण रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण करणार
Loading Comments