Advertisement

...नाहीतर 15 सप्टेंबरपासून बेमुदत बंद करू, मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचा इशारा

1 मार्च 2021 रोजी मिळालेल्या भाडेवाढीनंतर सीएनजीच्या दरात एकूण 32 रुपयांनी वाढ झाली आहे.

...नाहीतर 15 सप्टेंबरपासून बेमुदत बंद करू, मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचा इशारा
SHARES

आम्हाला भाडेवाढ न मिळाल्यास गणपती उत्सवानंतर (Ganesh Utsav) 15 सप्टेंबरपासून बेमुदत संपावर (Strike) जाऊ, असा इशारा मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे (mumbai taxi union) सरचिटणीस ए.एल क्वाड्रोस यांनी दिला आहे.

“आम्ही 1 ऑगस्टला आंदोलनाचा इशारा दिला होता. पण, आम्हाला लिखित आश्वासन मिळाल्यानं आम्ही आमचे आंदोलन स्थगित केले. पण आता एक महिना होत आला तरी भाडेवाढीविषयी वारंवार पत्रव्यवहार करूनदेखील पत्राला साधी पोचपावतीही मिळत नाही. 1 मार्च 2021 झालेल्या भाडे सुधारणेनंतर आतापर्यंत सीएनजीच्या दरात एकूण 32 रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे टॅक्सी-रिक्षा चालकांना प्रत्येक दिवशी 250 ते 300 रुपये जादा मोजावे लागताय,” असंही ए.एल क्वाड्रोस यांनी सांगितले.

महिनाभरात सीएनजीच्या दरात सलग चार ते पाच वेळा दरवाढ झाली असून डिझेल आणि सीएनजीचा दर जवळपास एकाच पातळीवर आला असल्याचे क्वॉड्रोस यांनी म्हटले असून टॅक्सी व रिक्षाचालकांचे आर्थिक गणित बिघडल्याचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.

1 मार्च 2021 रोजी मिळालेल्या भाडेवाढीनंतर सीएनजीच्या दरात एकूण 32 रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या टॅक्सीचे किमान भाडे 25 रुपये असून यामध्ये दहा रुपयांची वाढ करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.



हेही वाचा

मेट्रो लाईन 2A आणि 7 मुंबईकरांच्या सेवेत डिसेंबरपासून दाखल होण्याची शक्यता

"एसी लोकलपेक्षा साध्या लोकलच्या फेऱ्या वाढवा, अन्यथा...", जितेंद्र आव्हाडांचा इशारा

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा