Advertisement

इंधनाच्या वाढत्या दरांमुळे रिक्षा, टॅक्सी चालकही चिंतेत

इंधनाच्या वाढत्या दरामुळं सर्वसामान्यांच्या महिन्याच्या आर्थिक खर्चात वाढ झाली आहे. परिणामी या वाढत्या इंधाचा फटका आता रिक्षा व टॅक्सी चालकांनाही बसतोय.

इंधनाच्या वाढत्या दरांमुळे रिक्षा, टॅक्सी चालकही चिंतेत
SHARES

मुंबईसह राज्यभरात सध्या पेट्रोल व डिझेलच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढत आहे. इंधनाच्या वाढत्या दरामुळं सर्वसामान्यांच्या महिन्याच्या आर्थिक खर्चात वाढ झाली आहे. परिणामी या वाढत्या इंधाचा फटका आता रिक्षा व टॅक्सी चालकांनाही बसतोय. त्यामुळं हे वाढते दर लक्षात घेता टॅक्सी युनियननं इलेक्ट्रीक गाडीचा वापर करण्याचा विचारात असल्याचं स्पष्ट केलं. इलेक्ट्रीक गाड्यांना टॅक्सीचे रुप देऊन चालविण्याचा सल्लाही टॅक्सी युनियननं दिला.

सद्यस्थितीत रिक्षा व टॅक्सीच्या भाडेदरात वाढ करण्यात आली होती. प्रत्येकी ३ रुपयांनी ही वाढ करण्यात आली होती. परंतु, दिवसेंदिवस वाढणाऱ्या इंधनाच्या दरामुळं रिक्षा टॅक्सी चालकांनाही आर्थिक खर्च परवडत नाहीये. मिळालेल्या माहितीनुसार, यावर तोडगा काढण्यासाठी युनियनचे अधिकारी इलेक्ट्रीक कारचा वापर टॅक्सी म्हणून करता येईल का? यावर चर्चा करत असल्याची माहिती मिळते.

फ्रि प्रेस जर्नलच्या माहितीनुसार, या चर्चेनंतर भविष्यात इलेक्ट्रीक कारचा वापर टॅक्सी म्हणून करण्यास राज्य सरकारकडून परवानगी मिळणं गरजेच आहे. तसंच, परवानगी मिळाल्यास पर्यावरणही सुधारण्यास मदत होईल, असं ट्रेड युनियन आणि टॅक्सी युनियनचे नेते एल क्वॉड्रेक्स यांनी म्हटलं.

सद्यस्थितीत अनेक सार्वजनिक वाहनांना इलेक्ट्रीक वाहनांमध्ये रुपांतर केलं जात आहे. त्यामुळं भविष्यात रिक्षा व टॅक्सीचे ही इलक्ट्रीक वाहनांमध्ये रुपांतर केल्यास पर्यावरणाची होणारी हानी टळेल. तसंच, वाहनांमधून निघणाऱ्या धुरामुळं होणारे प्रदुषण ही कमी होईल.

सरकारी तेल कंपन्यांनी मंगळवारसाठी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. इंधनाच्या किंमतीत कोणतेही बदल झालेले नाहीत. राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल १०४.४४ रुपये प्रति लीटर आहे, तर डिझेल ९३.१८ रुपये प्रति लीटर आहे. सोमवारी पेट्रोलच्या किंमतीत ३० पैसे प्रति लीटर आणि डिझेलच्या दरात ३५ पैशांनी वाढ झाली होती.

या वाढत्या इंधनाच्या दरांमुळं वाहन चालवायचं की नाही? असा सवाल वाहन चालकांना सतावतोय. त्यामुळं येत्या काळात या खर्चातुन चालकांना दिलासा मिळणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा