Advertisement

मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत, सायन-माटुंगादरम्यान रुळाला तडे


मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत, सायन-माटुंगादरम्यान रुळाला तडे
SHARES

शनिवारी सकाळी कामाला जाण्याच्या आणि ऐन गर्दीच्या वेळेस मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. सायन-माटुंगा दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. तर, धिम्या मार्गावरील वाहतूक मात्र सुरळीत सुरू आहे. कुर्ल्याच्यापुढे जलदमार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावर वळवण्यात आली आहे.


लोकल उशिरा

सकाळी १൦ वाजता रुळाला तडे गेल्याचं लक्षात आल्यानंतर जलद मार्गावरील गाड्या किमान १५ ते २൦ मिनिटे एकाच ठिकाणी थांबून होत्या. सीएसटीएमकडे येणाऱ्या जलद लोकल काही मिनिटं उशिरानं धावत आहेत. रुळ दुरुस्तीचं काम अजूनही सुरू असून त्याचा फटका लोकलला आणि परिणामी प्रवाशांना बसणार आहे.


दोन दिवसांपूर्वी विठ्ठलवाडी स्थानकांतील रुळाला तडे गेल्याने तेव्हाही वाहतूक अशीच रखडली होती. मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांना वारंवार असे अनुभव येत असतात. कधी सिग्नल यंत्रणेत बिघाड, कधी पेंटोग्राफ तुटला, कधी इंजिन बंद पडले तर कधी रेल्वे रुळाला तडे गेले, यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत होत असते. पण, हल्ली रेल्वे रुळाला तडे गेल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

संबंधित विषय
Advertisement