Advertisement

मुसळधार पावसाने ४२ लोकल बिघडल्या


मुसळधार पावसाने ४२ लोकल बिघडल्या
SHARES

मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसात मध्य रेल्वेच्या ३५ लोकलमध्ये, तर पश्चिम रेल्वेच्या ७ लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे गुरूवार असूनही पुरेशा लोकल गाड्याअभावी मध्य रेल्वेवर रविवारच्या वेळापत्रकानुसार लोकल गाड्या चालविण्यात आल्या. तांत्रिक बिघाड झालेल्या लोकल दुरूस्त होऊन रुळावर येण्यास आणखी दोन दिवस लागणार आहेत.



आसनगावजवळ मंगळवारी नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसला झालेल्या अपघातानंतर विस्कळीत झालेली लोकलसेवा अजूनही 'रूळावर' येऊ शकलेली नाही. सद्यस्थितीत मध्य रेल्वेची लोकल वाहतूक सुमारे अर्धा तास उशिराने सुरु आहे. तर टिटवाळा-कसारा मार्ग अजूनही ठप्प आहे. त्यामुळे अनेक एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल सुरू आहेत.


वासिंद स्थानकात दादर-अमृतसर एक्स्प्रेस रोखली

सलग चौथ्या दिवशी कसाऱ्याहून मुंबईकडे येणारी लोकल सेवा ठप्प असल्याने शुक्रवारी सकाळी संतप्त प्रवाशांनी वासिंद स्थानकात रेलरोको आंदोलन सुरू केले. प्रवाशांनी दादर-अमृतसर एक्स्प्रेस रोखून धरली.



यामुळे एक्स्प्रेस गाड्यांनी कसारा, खर्डी, आटगाव आसनगाव, वासिंद आणि खडवलीपर्यंत येणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. विशेष म्हणजे लोकलच्या मार्गावरून काही एक्स्प्रेस गाड्या कल्याणच्या दिशेने रवाना होत असल्याने प्रवाशांच्या संतापात भर पडत आहे.

चार दिवस उलटूनही लोकल वाहतूक कधी सुरु होणार याबद्दल रेल्वे प्रशासनाकडून कुठलीही निश्चित माहिती देण्यात येत नसल्यामुळे प्रवाशांची नाराजी वाढत आहे. रेल्वे अधिकाऱ्यांकडून टिळवाळ्याहून कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली असली तरी ती प्रवाशांपर्यंत न पोहोचल्याने ही नाराजी वाढतच चालली आहे.

गुरूवारी रात्री दहा वाजेपर्यंत पूर्व आणि उत्तरेकडून येणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वेने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा