Advertisement

ठाणे स्थानकात रेल्वेबरोबरच हेलिकॉप्टरचाही थांबा

ठाणे स्थानकाच्या पुनर्विकासाचा आराखडा रेल्वे विकास भूमी प्राधिकरणाने तयार केला आहे.

ठाणे स्थानकात रेल्वेबरोबरच हेलिकॉप्टरचाही थांबा
SHARES

मुंबई लोकलमधील सर्वाधिक गर्दीचे स्थानक असलेल्या ठाणे स्थानकात आता रेल्वेबरोबरच हेलिकॉप्टरचा थांबा असणार आहे.

ठाणे स्थानकाच्या पुनर्विकासाचा आराखडा रेल्वे विकास भूमी प्राधिकरणाने तयार केला असून त्यात फलाटावर अतिरिक्त जागेच्या निर्मितीचे नियोजन करण्यात आलेले आहे.

वैद्यकीय आपत्कालीन स्थितीत प्रवाशांना जीवनदायी वेळेत (गोल्डन अवर्स) उपचार उपलब्ध व्हावेत, यासाठी हवाईमार्गे वेगाने अंतर कापता यावे, या उद्देशाने ठाणे स्थानकात हेलिपॅड उभारण्यात येणार आहे.

ठाणे स्थानक परिसरात उभारण्यात येणाऱ्या व्यावसायिक इमारतीच्या छतावर हेलिपॅड उभारण्यात येईल. त्यांसह बहुमजली वाहनतळ, प्रशस्त रूफ प्लाझा, फेरीवाल्यांसाठी विशेष व्यवस्था अशी सुविधा पुनर्विकासानंतर उपलब्ध होणार आहे.

स्थलांतरित रेल्वे वसाहतीमध्ये उभारल्या जाणाऱ्या इमारती आणि पूर्वेकडील सॅटिस इमारत अशा दोन जागा हेलिपॅडसाठी निश्चित करण्यात आल्या आहेत. यापैकी एका इमारतीच्या छतावर हेलिपॅड प्रस्तावित आहे. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत याचा वापर करण्यात येणार आहेत.

ठाण्यात भविष्यातील गर्दी सुलभपणे हाताळता यावी, यांसह पूर्व-पश्चिम दिशेला जोडणारे नवे पर्याय उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने ठाणे स्थानकाचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठाणे स्थानकातील गर्दीचे वेगाने हाताळण्यासाठी १७ सरकते जिने, २० लिफ्ट, ३ ट्रॅव्हलेटर (सरकता रस्ता) या आधुनिक सुविधा उभारण्यात येणार आहेत.



हेही वाचा

मुंबईकरांचा प्रवास होणार आणखी गारेगार, लवकरच धावणार 238 एसी लोकल

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा