Advertisement

ठाण्यात बाईकवर डबलसीट बसाल तर दंड

लाॅकडाऊन शिथिल केल्यानंतर ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. मोठ्या संख्येने गाड्या रस्त्यावर येऊ लागल्या असून यामध्ये बाईकचे प्रमाण सर्वाधिक आहे.

ठाण्यात बाईकवर डबलसीट बसाल तर दंड
SHARES

ठाणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या रोज मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचं पालन होत नसल्याचं दिसून आलं आहे. बाईकवर डबलसीट बसणाऱ्यांविरोधात आता ठाणे वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.  बाईकवर डबलसीट आढळल्यास दुचाकीस्वारांकडून यापुढे २२०० रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार असल्याचं वाहतूक विभागानं सांगितलं आहे. यासाठी शहरातील महत्वाच्या चौकांवर वाहतूक पोलिसांनी नाकेबंदी करण्यास सुरुवात केली आहे.

लाॅकडाऊन शिथिल केल्यानंतर ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.  मोठ्या संख्येने गाड्या रस्त्यावर येऊ लागल्या असून यामध्ये बाईकचे प्रमाण सर्वाधिक आहे.  नागरिक बाईक घेऊन घराच्या बाहेर पडत आहेत. अनेक बाईकवर डबलशीट असल्याचं दिसून येत आहे. बाईकवर केवळ घरातील एकाच व्यक्तीने बाहेर पडावं असं आवाहन करण्यात आलं होतं. मात्र, या आवाहनाला हरताळ फासला गेला आहे. यामध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात नसून कोरोनाचा आणखी फैलाव वाढण्याची मोठी भिती आहे. त्यामुळे डबलसीट चालवणाऱ्यांविरोधात वाहतूक विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. 

ठाणे वाहतूक विभागाने शहरातील प्रमुख रस्त्यांवर आणि प्रमुख चौकांवर नाकेबंदी करण्यास सुरुवात केली आहे. स्टेशन परिसर, जांभळी नाका गावदेवी, हरिनिवास सर्कल, तीन पेट्रोल पंप, पोस्ट ऑफिस तसेच कोपरी अशा ठिकाणी कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. सोशल मीडियावर बाईकस्वार एकमेकांना  बाईकवर डबलसीट जाऊ नये असा संदेश देखील पाठवत आहेत.



हेही वाचा -

सोमवारी मुंबईत २० जणांचा मृत्यू; मृत्यूंची संख्या घटली

दारू पिण्याच्या परवानगीसाठी ‘इतक्या’ जणांनी केले अर्ज




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा