Advertisement

मेट्रोतर्फे घाटकोपर स्थानकात महिलांसाठी 'पावडर रूम लाउंज' सुविधा

घाटकोपर रेल्वे स्थानकात महिलांसाठी मुंबई मेट्रो वनतर्फे देशातील पहिल्या 'वोलू पावडर रूम लाउंज'ची सुविधा देण्यात आली आहे.

मेट्रोतर्फे घाटकोपर स्थानकात महिलांसाठी 'पावडर रूम लाउंज' सुविधा
SHARES

घाटकोपर रेल्वे स्थानकात महिलांसाठी मुंबई मेट्रो वनतर्फे देशातील पहिल्या 'वोलू पावडर रूम लाउंज'ची सुविधा देण्यात आली आहे. या सेवेचे रविवारी रेल्वे पोलिस आयुक्त कैसर खलिद यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. महिलांसाठीचे हे लाउंज १००० चौरस फुटांचे आहे.

या लाउंजमध्ये वाय-फाय सुविधा, वातानुकूलित यंत्रणा, ८ स्मार्ट स्वच्छतागृहे यांचा समावेश आहे. त्याशिवाय इथं सॅनिटरी पॅडचा डिस्पेन्सरही आहे.

लहान मुलांचे डायपर बदलण्याची सोय, सुरक्षेच्या दृष्टीने चेहराओळख सॉफ्टवेअरयुक्त सुरक्षितता येथे कार्यान्वित करण्यात आली आहे. १४ आसनी कॅफे हेही या लाउंजचे एक आकर्षण आहे, अशी माहिती मेट्रो वन प्रशासनाने दिली.

मुंबई रेल्वे पोलिस दलातील महिलांना आयएपीएमओ आणि आयडब्ल्यूएसएचतर्फे ओलू पावडर रूम आणि ओलू ॲप देण्यात आले. मुंबईतील स्वच्छ व जवळची स्वच्छतागृहे शोधण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा