Advertisement

सीएसएमटीवरुन २४ डब्ब्यांच्या मेल- एक्स्प्रेससाठी प्लॅटफॉर्मचे विस्तारीकरण जोमात

यामुळे २४ डब्यांच्या रेल्वेगाड्यांमुळे प्रतिमेल-एक्स्प्रेसची आसनक्षमता ८००ने वाढणार आहे.

सीएसएमटीवरुन २४ डब्ब्यांच्या मेल- एक्स्प्रेससाठी प्लॅटफॉर्मचे विस्तारीकरण जोमात
SHARES

सीएसएमटीमधील फलाट क्रमांक १०-११च्या विस्तारीकरणाचे सुरू असलेले काम सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार आहे. याचा फायदा असा होणार आहे की, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून २४ डब्यांच्या मेल-एक्स्प्रेसाठी आता फलाट उपलब्ध होणार आहे. यामुळे २४ डब्यांच्या रेल्वेगाड्यांमुळे प्रतिमेल-एक्स्प्रेसची आसनक्षमता ८००ने वाढणार आहे.

अनेक वर्षांपासून फलाट विस्तारीकरणाचा प्रकल्प रखडला होता. मुंबई विभाग आणि मध्य रेल्वे मुख्यालय यांतील वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी साचेबद्ध नियोजन सुरू केले.

रेल्वे वाहतूक अबाधित ठेवण्यासाठी पहिल्या टप्प्यात फलाट क्रमांक १०-११ आणि दुसऱ्या टप्प्यात फलाट क्रमांक १२-१३ यांचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे.

पहिल्या टप्यातील कामाचा शेवटचा टप्पा सुरू असून सप्टेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. यामुळे सीएसएमटीपर्यंत येणाऱ्या काही रेल्वेगाड्या दादर स्थानकापर्यंत चालवण्यात येणार आहेत.

सप्टेंबरपर्यंत गाड्यांच्या थांब्यात बदल राहणार आहे. येत्या दिवाळीत सीएसएमटीहून २४ डब्यांच्या अतिरिक्त फेऱ्या चालवण्याचे नियोजन आहे, असे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सध्या चार फलाटांवर प्रत्येकी १७-१८ डब्यांच्या मेल-एक्स्प्रेस थांबतात. विस्तारीकरणानंतर सहा-सात डबे जोडण्यात येतील. एका डब्याची सरासरी आसनक्षमता ७० असते. यामुळे प्रतिफेरीमागे सुमारे ८४० आसने प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत.

अतिरिक्त फलाटांमुळे रोज १० वाढीव फेऱ्या चालवणे शक्य आहे, असा रेल्वेचा दावा आहे. सध्या फलाट क्रमांक १५ ते १८ यांवर २४ डब्यांच्या मेल-एक्स्प्रेससाठी जागा उपलब्ध आहे.

विस्तारीकरणानंतर आणखी दोन फलाट उपलब्ध होणार आहेत. यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात सीएसएमटीतील फलाट विस्तारीकरणासाठी ६० कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे.



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा