Advertisement

प्रवाशांसमोर रेल्वे प्रशासनानेही टेकले हात


प्रवाशांसमोर रेल्वे प्रशासनानेही टेकले हात
SHARES

गोरेगाव - पूर्वेकडून रेल्वे स्टेशनला जाताना रोज सकाळी आणि संध्याकाळी स्टेशन परिसरात रिक्षा, बस आणि पादचाऱ्यांची गर्दी असते. त्यामुळं नागरिक फलाट क्रमांक चारवर येणारी रेल्वे पकडण्यासाठी जीव मुठीत घेऊन रुळ ओलांडताना दिसतात.
गोरेगाव फलाट क्रमांक चारवर येणारी विरार लोकल पकडण्यासाठी प्रवाशी आपत्कालीन दुर्घटना झाल्यास बाहेर पडण्यासाठी बनवलेल्या गेटचा वापर करत आहेत. त्यामुळे जीवघेणा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रेल्वे प्रशासनाने अनेक वेळा लोकांचे जीव वाचावे या करता गेटला टाळंही लावलं. मात्र प्रवाशांच्या मागणीनंतर गेट परत खुला करण्यात आला आहे
'या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी असते त्यामुळे प्रवासी रेल्वे पकडायच्या घाईत या रस्त्याचा वापर करतात' असं प्रवासी राकेश कदम यांनी सांगितलं.
तर याबाबत गोरेगाव स्टेशन अधिक्षक दिनेश चोरगे यांना विचारले असता 'प्रत्येक महिन्यात रुळ ओलांडतांना ५ ते ६ लोकाचा जीव जातो. तो रस्ता रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आहे. मात्र प्रवासी गोरेगाव आणि विरार रेल्वे पकडण्यासाठी जीव मुठीत घेऊन पळतात, अनेकदा गेट बंदही केला तरी प्रवासी ओरडाओरड करून खोलण्यास सांगतात.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा