Advertisement

सावधान! ... रेल्वे स्टेशनवर 'यम'राज

रेल्वे स्थानकावर तुम्हाला यमराज फिरताना दिसला की सावध व्हा... नाहीतर तो तुम्हाला उचलून घेऊन जाईल.

सावधान! ... रेल्वे स्टेशनवर 'यम'राज
SHARES

हातात गढा... अंगावर काळे वस्त्र... डोक्याला शिंग... हा यमराज आहे हे त्याला पाहून कोणालाही कळून येईल. पण तो रेल्वे स्टेशवर काय करतोय? तो आपल्यालाच दिसतोय की सर्वांना? असा प्रश्न प्रत्येकाला पडावा. तो आलाय म्हणजे कुणाला तरी घेऊन जाणार असच सर्वांना वाटत होतं. तो मी तर नाही? अशी शंकाही प्रत्येकाच्या मनात डोकावत होती. पण तो आला आणि रेल्वेरूळ पार करणाऱ्या एकाला उचलून प्लॅटफॉर्मवर घेऊन आला. यमराजला पाहून टेंशनमध्ये येणाऱ्या प्रवाशांच्या चेहऱ्यावर हसू आलं. तेव्हा सर्व प्रकार प्रवाशांना कळाला आणि त्यांचा जीवात जीव आला.

सुरक्षेसाठी 'अशी'ही आयडिया

रेल्वेनं सुरक्षेच्या दृष्टीनं आयडियाची कल्पना केली. या अंतर्गत रेल्वेरूळ ओलांडणाऱ्यांना थांबवण्यासाठी चक्क यमराज अवतरले होते. हे यमराज प्रवशांना स्वर्गात न्यायला नव्हते आले. तो प्रवाशांना वाचवायला आला होता. एखादा प्रवासी रेल्वे रुळ ओलांडताना दिसला की यमराज त्या प्रवाशाला उचलून सुरक्षित स्थळी पोहचवत होता.


हा... हा... हा... यम है हम

यमराजच्या वेशातील हा माणूस रेल्वे संरक्षण दलातील जवान आहे. ६ नोव्हेंबरपासून या जागरुकता मोहिमेला सुरुवात झाली. जो भी पटरी क्रॉस करेगा उसको उठाके ले जाऊंगा, असं म्हणत हा प्रवाशांना उचलताना दिसतोय. रेल्वे जागरुकता मोहिमेत पश्चिम रेल्वेनं अंधेरी आणि मालाड या स्थानकांची निवड केली आहे. कारण या स्थळांवर कुंपणावरून उडी मारून रेल्वे रुळ क्रॉस करून जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

'रेल्वे रुळ ओलांडू नका'

रेल्वेची सुरक्षा भिंत तोडून, स्थानकांतील उद्घोषणांकडे दुर्लक्ष करून सर्रास रेल्वेरूळ ओलांडले जातात. परिणामी लोकल मार्गावर होणा-या अपघातांमध्ये सर्वाधिक अपघात रेल्वेरूळ ओलांडताना होतात. आपल्या इच्छित स्थळी पोहोचण्याच्या घाईत असे प्रकार सर्रास घडत असतात. अनेक ठिकाणी पर्यायी व्येवस्था नसेल तर त्यात रेल्वेचा दोष आहे. पण जिथे एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी ब्रिजचा पर्याय दिलेला असतो.

पण तिकडे सुद्धा प्रवासी घाईच्या नादात त्याचा वापर करत नाहीत आणि यामुळे स्वत:चा जीव धोक्यात घालून रेल्वेरूळ पार करतात. आता असे प्रकार रोखण्यासाठी रेल्वे देखील प्रयत्न करत असते. दर पाच मिनिटांनी रेल्वे रूळ पार करू नका अशा घोषणा होत असतात. पण त्याकडे प्रवासी दुर्लक्ष करतात. पण आता रेल्वेनं हे जास्त मनावर घेतलेलं दिसतंय



हेही वाचा

मध्य रेल्वेकडून 'इतक्या' मुलांची घरवापसी

मध्य रेल्वेच्या 'या' एक्स्प्रेस होणार ‘उत्कृष्ट’


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा