Advertisement

मध्य रेल्वेच्या 'या' एक्स्प्रेस होणार ‘उत्कृष्ट’


मध्य रेल्वेच्या 'या' एक्स्प्रेस होणार ‘उत्कृष्ट’
SHARES

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी-कोल्हापूर या मार्गावर धावणाऱ्या सीएसएमटी-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये आता सुधारणा करण्यात येणार आहेत. उत्तम आसनव्यवस्था, बायोटॉयलेट, एलईडी दिवे या सुविधा आता सीएसएमटी-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्येही उलब्ध होणार आहेत. मार्च अखेरपर्यंत एकूण ३० मेल-एक्स्प्रेस डब्यांचं रूपांतर 'उत्कृष्ट' डब्यांमध्ये करण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतला आहे.

हेही वाचा - मुंबईतील उड्डाणपूलं बेस्ट बससाठी खुली करण्याची 'या' संस्थेची मागणी

डब्यांना नवा साज

मेल-एक्स्प्रेसच्या डब्यांमध्ये नवा साज मिळाल्यानं लांब पल्ल्यांचा प्रवास अधिक आरामदायी होणार आहे. 'उत्कृष्ट' अंतर्गत मुंबई-पुणे प्रगती एक्स्प्रेसचे डबे ४ नोव्हेंबर २०१८ रोजी बदलण्यात आले. डब्यांमध्ये मोठे आरसे, शौचालयातील दुर्गंधी टाळण्यासाठी बायोटॉयलेट, स्पष्ट व स्वच्छ प्रकाशासाठी एलईडी दिवे कार्यान्वित करण्यात आले आहेत.

हेही वाचा - सायन पुलाच्या दुरुस्तीचं काम, पुन्हा वाहतूककोंडीची शक्यता

१० गाड्यांचं काम पूर्ण

'उत्कृष्ट'अंतर्गत एकूण ३० मेल-एक्स्प्रेस गाड्यांना नवे रूप देण्यात येणार आहे. त्यांपैकी १० मेल-एक्स्प्रेस गाड्यांचं काम पूर्ण झालं आहे. तसंच, उर्वरित गाड्यांचं काम सुरू आहे. यामध्ये मुंबई (सीएसएमटी)-कोल्हापूर महालक्ष्मी, कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस यांचा समावेश आहे. मार्च २०२० अखेरीस हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.



हेही वाचा -

मुंबईच्या महापौरपदी यशवंत जाधव?

मधुमेहग्रस्तांनी करावं 'या' ५ फळांचं सेवन



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा