SHARE

मुंबईतील सायन उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचं काम करण्यात येत आहे. दुरूस्तीचं काम सुरू झाल्यानं २२ नोव्हेंबरपासून ४५ दिवस पूल वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. उड्डाणपुलाचं १७० बेअरिंग बदलण्याच्या प्राथमिक कामास सुरुवात झाली. २२ नोव्हेंबरपासून लिफ्टिंग आणि बेअरिंग बदलण्याच्या कामास सुरुवात होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून देण्यात आली आहे.

अवजड वाहनांना बंदी

या उड्डाणपुलावरून डिसेंबर २०१८ पासून अवजड वाहनांना बंदी आहे. तसंच, आता २२ नोव्हेंबरपासून लिफ्टिंगचे काम सुरू केल्यानंतर सर्वच वाहनांसाठी उड्डाणपूल बंद करण्यात येणार आहे. मात्र, याबाबत कोणतीही माहिती अद्याप झालेली नाही. ३ दिवसांपूर्वी बीकेसी कनेक्टर हा सोमय्या मैदान ते वांद्रे-कुर्ला संकुल उन्नत मार्ग सुरू झाल्यानंतर शीव येथील वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी झाली असताना उड्डाणपुलाच्या कामामुळं पुन्हा वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागणार आहे.


उड्डाणपुलाचं बांधकाम

या उड्डाणपुलाचं बांधकाम महामंडळातर्फे २००० मध्ये करण्यात आलं होतं. मात्र, आयआयटी मुंबईनं मागील वर्षी या उड्डाणपुलाची संरचनात्मक तपासणी केली होती. पुलाच्या सांध्यांमध्ये पोकळी निर्माण झाल्यानं १७० बेअिरग बदलण्याची शिफारस करण्यात आली. बेअरिंग बदलण्याच्या कामाला डिसेंबर २०१८ मध्येच सुरुवात होणार होती, परंतु, निविदा प्रक्रिया लांबल्यानं कामाला सुरुवात झाली नाही.


दुरुस्तीचं काम

त्यानंतर, २८ मार्चला या पुलाच्या स्लॅबचा प्लास्टरचा १० बाय १५ सेमीचा तुकडा कोसळल्यानंतर एप्रिलमध्ये दुरुस्तीचं काम त्वरित हाती घेण्यात येणार होतं. मात्र, त्यावेळी देखील काही कारणात्सव दुरूस्तीचं काम रखडलं. त्यानंतर भर पावसाळ्यात जुलैमध्ये काम सुरू करण्यात येणार होतं. त्यावेळी मूळ कंत्राटानुसार १२ जॅक वापरण्याऐवजी १०० जॅकचा वापर करण्याचं ठरलं. त्यानुसार ६० लाख रुपयांचा अतिरिक्त खर्चदेखील मंजूर करण्यात आला. मूळ कंत्राटानुसार केवळ १२ जॅकच्या साहाय्यानं दुरुस्तीचं काम केलं असतं तर ४ ते ५ महिन्यांचा कालावधी लागला असता. हा कालावधी कमी करण्यासाठी अधिक जॅक वापरण्याचं ठरलं.हेही वाचा -

अॅण्टॉप हिलमध्ये दोन बहिणींवर अत्याचार

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, आमदार बच्चू कडू आक्रमकसंबंधित विषय
ताज्या बातम्या