Advertisement

मुंबईच्या महापौरपदी यशवंत जाधव?


मुंबईच्या महापौरपदी यशवंत जाधव?
SHARES

मुंबई महापौरपदासाठी २२ नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी १८ तारखेला उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. तसंच, यंदा शिवसेनेकडून मुंबईच्या महापौरपदासाठी स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांना संधी दिली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबच पालिकेतली शिवसेना वर्तुळात चर्चा सुरू असल्याचं समजतं.

खुल्या वर्गासाठी आरक्षित

यंदा मुंबईचे महापौरपद खुल्या वर्गासाठी आरक्षित असून या पदासाठी शिवसेनेतून अनेक नगरसेवक आणि नगरसेविका इच्छुक आहेत. जेष्ठत्वाचा मुद्दा पुढे करत तर काहींनी आत्तापर्यंत कोणतेही पद न मिळाल्याची सबब पुढे केली आहे. परंतु, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मर्जीतील यशवंत जाधव या स्पर्धेत सर्वात पुढे असल्याचं म्हटलं जातं आहे.

हेही वाचा - जीएसटी भरण्याची मुदत वाढली, 'ह्या' तारखेपर्यंत भरता येणार

स्थायी समिती

दरम्यान यशवंत जाधव यांना महापौर केल्यास वरळीतील शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक आशीष चेंबूरकर हे स्थायी समितीचे अध्यक्ष होणार असल्याचीही शक्याता वर्तवली जात आहे. विधानसभा निवडणुकीत वरळी येथून आदित्य ठाकरे यांना निवडून आणण्यासाठी सुनील शिंदेंसोबत आशीष चेंबूरकर यांनीही मेहनत केल्यानं त्यांना या कामाचं बक्षिस म्हणून स्थायी समितीचे अध्यक्षपद दिले जाण्याची शक्यता वर्तवली आहे.हेही वाचा -

अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल

महाशिवआघाडीचा मसुदा तयार? सत्ता स्थापनेच्या दिशेने एक पाऊल पुढे...Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा