Advertisement

जीएसटी भरण्याची मुदत वाढली, 'ह्या' तारखेपर्यंत भरता येणार

ज्यांनी अद्याप जीएसटी परतावा भरला नाही त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. जीएसटी रिटर्न भरण्यासाठी केंद्र सरकारने शेवटची तारीख वाढविली आहे.

जीएसटी भरण्याची मुदत वाढली, 'ह्या' तारखेपर्यंत भरता येणार
SHARES

ज्यांनी अद्याप जीएसटी परतावा भरला नाही त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. जीएसटी रिटर्न भरण्यासाठी केंद्र सरकारने शेवटची तारीख वाढविली आहे. अर्थ मंत्रालयाने एका प्रसिद्धीपत्रकात ही माहिती दिली आहे. या प्रसिद्धीपत्रकानुसार, २०१७ -१८ या आर्थिक वर्षासाठी जीएसटी रिटर्न भरण्याची अंतिम तारीख आता ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत वाढविली आहे. 

सरकारने २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी जीएसटी रिटर्न मुदतदेखील वाढविली आहे. ही मुदत आता ३१ मार्च २०२० पर्यंत आहे. तर आर्थिक वर्ष २०१७-१८ साठी जीएसटीआर -९ (वार्षिक रिटर्न फॉर्म) आणि जीएसटीआर -९ सी (रिकन्सिलेशन स्टेटमेंट) ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत आणि आर्थिक वर्ष २०१८-१८ साठी ३१ मार्च २०२० पर्यंतभरता येणार आहे. यापूर्वी ही तारीख अनुक्रमे ३० नोव्हेंबर आणि ३१ डिसेंबर होती.

जीएसटी रिटर्न भरण्याची तारीख वाढविण्याबरोबर सरकारने लोकांना आणखी एक दिलासा दिला आहे. आता सरकारनेही विवरण भरण्याची संपूर्ण प्रक्रिया सोपी केली आहे. जीएसटी रिटर्न फॉर्ममध्ये आता बऱ्याच बाबी वैकल्पिक केल्या आहेत. 



हेही वाचा -

चुकीचा आधार क्रमांक देणं महागात पडणार, द्यावा लागणार 'इतका' दंड

SBI कडून ग्राहकांना अलर्ट, ट्विट करत दिल्या 'ह्या' सूचना




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा