Advertisement

SBI कडून ग्राहकांना अलर्ट, ट्विट करत दिल्या 'ह्या' सूचना

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय -SBI) च्या ग्राहकांची ऑनलाइन फसवणूक होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे एसबीआयने आपल्या ४२ कोटी ग्राहकांना आता अलर्ट केलं आहे.

SBI कडून ग्राहकांना अलर्ट, ट्विट करत दिल्या 'ह्या' सूचना
SHARES

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय -SBI) च्या ग्राहकांची ऑनलाइन फसवणूक होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे एसबीआयने आपल्या ४२ कोटी ग्राहकांना आता अलर्ट केलं आहे. एसबीआयने ट्विट करून ग्राहकांना कोणालाही तुमच्या कार्डची माहिती इतरांना देऊ नका अशी सूचना केली आहे. 

तुमच्या बँकेच्या खात्याची डिटेल्स, पासवर्ड, पिन, ओटीपी, सीव्हीव्ही, युपीआय-पिन इत्यादी माहिती फक्त स्वत:कडेच ठेवा. इतर कोणालाही देऊ नका. जागृत व्हा आणि सावध रहा असं ट्विट एसबीआयने केलं आहे. गेल्या महिन्यापासून एसबीआयच्या अनेक ग्राहकांना मेसेज येत आहेत. देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा आणि तुमच्या इन्कम टॅक्स रिफंडबद्दल माहिती मिळेल, असं या मेसेजमध्ये सांगण्यात येत आहे. त्यामुळे एसबीआयने आपल्या ग्राहकांना सावध केलं होतं. इन्कम टॅक्स रिफंडबद्दलच्या कोणत्याही मेसेजवर क्लिक करू नका असं एसबीआयने सांगितलं होतं. 

एसबीआयने आणखी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये म्हटलं की, तुमच्या नकळत खात्यावरून पैसे काढल्याचा मेसेज आल्यास त्वरीत बँकेला कळवा. तुमच्याकडून लवकर माहिती मिळाल्यास बँकेकडून लगेच कार्यवाही करता येईल. 



हेही वाचा -

सावधान! पॅन क्रमांक चुकीचा दिला तर द्यावा लागेल दंड

मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीसाठी आता लागणार 'एवढे' दिवस




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा