मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीसाठी आता लागणार 'एवढे' दिवस

मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी (एमएनपी) चा नवीन नियम १६ डिसेंबरपासून लागू होणार आहे.

SHARE

 मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी (एमएनपी) चा नवीन नियम १६ डिसेंबरपासून लागू होणार आहे. या नियमानुसार आता मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी करण्यासाठी अवघे २ दिवस लागणार आहेत. या आधी पोर्टेबिलिटी करण्यासाठी ८ दिवसांच्या कालावधी लागत होता.

 मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी करण्याचा कालावधी २ दिवस केला असल्याची माहिती भारतीय दूरसंचार नियामक आयोगाने (ट्राय) दिली आहे. हा नवीन नियम  १६ डिसेंबरपासून लागू होईल. ग्राहकाला दुसऱ्या सर्कलमध्ये नंबर बदलायचा असेल तर मात्र  चार दिवसांचा कालावधी लागणार आहे. १३ डिसेंबर २०१८ रोजी ट्रायने एक प्रसिध्दीपत्रक काढलं होत. यानुसार  ११ नोव्हेंबर २०१९ पासून पोर्टेबिलिटीच्या नवीन नियमांची अंमलबजावणी होणार होती.  मात्र काही चाचण्यांसाठी विलंब झाल्याने आता या नियमाची अंमलबजावणी १६ डिसेंबरपासून होणार आहे.

एमएनपी प्रक्रिया एका दिवसात करावी, असा निर्णय सुरुवातीला घेतला होता. मात्र दूरसंचार मंत्रालयाशी केलेल्या चर्चेनंतर व त्यांच्याकडून आलेल्या सुचनेनंतर ही मुदत दोन दिवस करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ट्रायने आंतरराष्ट्रीय इनकमिंग कॉल टर्मिनेशन शुल्काबाबत मते मागवली आहेत. मागील वर्षी १ फेब्रुवारीपासून हे शुल्क ३० पैसे प्रति मिनिट  केले होते. त्यापूर्वी ते ५३ पैसे प्रति मिनिट होते. हे शुल्क आंतरराष्ट्रीय आॅपरेटर कडून देशातील ज्या स्थानिक नेटवर्कवर कॉल येतो त्यांना दिले जाते. याबाबत संबंधितांना ९ डिसेंबरपर्यंत सूचना पाठवता येतील व त्यावर काही आक्षेप असतील तर २३ डिसेंबरपर्यंत नोंदवता येतील असं ट्रायने म्हटलं आहे. हेही वाचा -

डेटा चोरीपासून 'असं' वाचवा आपलं Debit आणि Credit Card
संबंधित विषय
ताज्या बातम्या