सावधान! पॅन क्रमांक चुकीचा दिला तर द्यावा लागेल दंड

जर कोणताही फॉर्म भरताना जर पॅन नंबर विचारला असेल तर पॅन नंबर काळजीपूर्वक भरा. कारण जर तुम्ही चुकीचा पॅन नंबर दिला तर तुम्हाला मोठा दंड होऊ शकतो.

SHARE

जर कोणताही फॉर्म भरताना जर पॅन नंबर विचारला असेल तर पॅन नंबर काळजीपूर्वक भरा. कारण जर तुम्ही चुकीचा पॅन नंबर दिला तर तुम्हाला १० हजार रुपये दंड होऊ शकतो. प्राप्तिकर अधिनियम १९६१ च्या कलम २७२ बी अंतर्गत आयकर विभाग चुकीचा पॅन नंबर देण्यासाठी तुम्हाला १० हजार रुपये दंड आकारू शकते. आयकर विवरणपत्र (आयटीआर) दाखल करीत असताना आणि इतर फाॅर्म भरताना पॅनचा उल्लेख करणे अनिवार्य असते तेथे आपला पॅन तपशील देत असताना हा नियम लागू होतो.

प्राप्तिकर विभागाकडे अशा २० प्रकरणांची यादी आहे जिथं पॅन क्रमांक देणं बंधनकारक आहे. उदाहरणार्थ, बँक खातं उघडणं, कार खरेदी करणं किंवा विक्री करणं, म्युच्युअल फंड खरेदी करणं, समभाग, डिबेंचर, बाँड्स इ. खरेदी करतेवेळी पॅन नंबर देणं बंधनकारक आहे.  एकदा पॅन कार्ड मिळाल्यानंतर आपण पुन्हा अर्ज करू शकत नाही. कारण पॅन कार्ड एकदाच बनते आणि ते आजीवन वैध असते. 

बँका आपल्याला नेहमी पॅनकार्डची छायाप्रत देण्यास सांगते. याचं कारण म्हणजे तर तुम्ही अनवधनाने फॉर्ममध्ये चुकीचा नंबर दिला असेल तर बँक छायाप्रतीद्वारे पडताळणी करू शकते. जर तुम्हाला पॅन नंबर आठवत नसेल तर तुम्ही आधार कार्ड नंबरदेखील देऊ शकता. मात्र, पॅनच्या बदल्यात तुम्ही चुकीचा आधार क्रमांक दिल्यास तुम्हाला १० हजार रुपये दंड होऊ शकतो. याशिवाय व्यवहारामध्ये पॅन किंवा आधार क्रमांकाचा उल्लेख न केल्याबद्दलदेखील दंड आकारला जाऊ शकतो.


दोन पॅनकार्ड असल्यास काय?

कोणत्याही व्यक्तीस एकापेक्षा जास्त पॅन बाळगण्याची परवानगी नाही. जर दोन पॅन असल्यास प्राप्तिकर अधिनियम १९६१ च्या कलम २७२ बी नुसार १० हजार रुपये दंड होऊ शकतो. आपल्याकडे दोन पॅनकार्ड असल्यास, त्यापैकी एक लवकरात लवकर परत करा. जर पॅन आधारशी जोडलेला नसेल तर ३१ डिसेंबरनंतर प्राप्तिकर विभागाकडून असे पॅनकार्ड अवैध घोषित केले जाण्याची शक्यता आहे.हेही वाचा -

मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीसाठी आता लागणार 'एवढे' दिवस

डेटा चोरीपासून 'असं' वाचवा आपलं Debit आणि Credit Card
संबंधित विषय
ताज्या बातम्या