चुकीचा आधार क्रमांक देणं महागात पडणार, द्यावा लागणार 'इतका' दंड

जेव्हापासून एकमेकांच्या जागी पॅन आणि आधार कार्ड वापरण्याची तरतूद आली तेव्हापासून आधार कार्डसाठीही दंड आकारण्यास सुरूवात झाली.

SHARE

करदात्यांच्या सोयीसाठी प्राप्तिकर विभागाने आधार कार्डधारकांना पॅन कार्ड क्रमांकाऐवजी १२ अंकी आधार कार्ड नंबर वापरण्याची परवानगी दिली. मात्र, आधार कार्ड वापरताना आपण सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. कारण चुकीचा आधार नंबर दिल्यास तुम्हाला १० हजार रुपये दंड भरावा लागू शकतो. याआधी पॅन नंबर चुकीचा दिल्यास १० हजार रुपये दंड आकारण्याची तरतूद आहे. 

 आयकर कायदा १९६१ मध्ये नुकत्याच करण्यात आलेल्या दुरुस्तीमुळे लोकांना पॅनच्या बदल्यात आधार कार्ड वापरण्याची परवानगी मिळाली आहे.  तर यामध्ये चुकीचा आधार क्रमांक दिल्यास दंड आकारण्याचीही तरतूद केली आहे. मात्र, जेथे पॅनकार्ड देणे अनिवार्य आहे, परंतु ती व्यक्ती पॅन नसल्यामुळे आधार क्रमांक देते तेथे हा नियम लागू आहे. आधार नंबर चुकीचा दिल्यास १० हजार दंड आकारला जाणार आहे.

आधार कार्ड युआयडीएआय जारी करत असले तरी युआयडीएआयकडून दंड आकारला जात नाही. तर हा दंड आयकर विभाग आकारते.  याआधी हा दंड फक्त पॅनपुरता मर्यादित होता. परंतु जेव्हापासून एकमेकांच्या जागी पॅन आणि आधार कार्ड वापरण्याची तरतूद आली तेव्हापासून आधार कार्डसाठीही दंड आकारण्यास सुरूवात झाली. 


या प्रकरणात दंड आकारला जाईल

  • जर तुम्ही पॅनऐवजी चुकीचा आधार नंबर दिला असेल
  • विशेष व्यवहारात  पॅन आणि आधार दोन्ही दिले नसतील तर 
  • फक्त आधार नंबर देणे पुरेसे नाही. आपली बायोमेट्रिक ओळख देखील प्रमाणित केली पाहिजे. असं न केल्यास आपल्याला दंड भरावा लागेल
  • नवीन नियमांतर्गत, पॅन आणि आधार क्रमांक योग्यरित्या लिहिण्याची व पडताळणी केल्याची खात्री नसल्यास बँका, वित्तीय संस्थांना दंड आकारला जाऊ शकतो.
  • प्रत्येक चुकीसाठी दहा हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे. जर आपण दोन फॉर्ममध्ये वेगवेगळे आधार क्रमांक दिले असतील तर आपल्याला २० हजार रुपये दंड भरावा लागेल.हेही वाचा -

सावधान! पॅन क्रमांक चुकीचा दिला तर द्यावा लागेल दंडसंबंधित विषय
ताज्या बातम्या