Advertisement

अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल

शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळावा. यासाठी आमदार बच्चू कडू यांनी गुरूवारी थेट राजभवावर मोर्चा काढला.

अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल
SHARES

शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीच्या मुद्यावर आक्रमक झालेल्या आमदार बच्चू कडू यांनी गुरूवारी थेट राजभवनावर मोर्चा काढला. या प्रकरणी आमदार बच्चू कडूंसह सहा जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

अवकाळी पावसांमुळे राज्याचा शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत असताना. सत्तास्थापनेवरून राजकिय पक्षांच्या मतभेदामुळे आधी राष्ट्रपती राजवट राज्यपालांनी लागू केली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळावा. यासाठी आमदार बच्चू कडू यांनी गुरूवारी थेट राजभवावर मोर्चा काढला.  बच्चू कडू यांच्यासह सुमारे दिडशे कार्यकर्ते मोर्चा घेऊन जात असताना पोलिसांनी त्यांना नरीमन पॉईंट येथील मित्तल टॉवर येथे अडवले. मलबार हील आणि मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यांचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक बच्चू कडू यांना फौजदारी प्रक्रीया संहीता कलम 149 नुसार नोटीस देण्यासाठी गेले असता आंदोलनकर्त्यानी तेथेच निदर्शने सुरु केली. आक्रमक झालेल्या आंदोलनकर्त्यांनी पोलिसांविरोधात घोषणाबाजी करत, पार्टीचे झेंडे आणि शेतमाल उडविण्यास सुरुवात केली.

अखेर पोलिसांनी बलाचा वापर करत बच्चू कडू यांच्यासह काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. कडू यांच्यासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करुन अटक करत त्यांना जामिनावर मुक्त करण्यात आले आहे. तर 4 आंदोलकांना ताब्यात घेऊन सोडून देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा