मधुमेहग्रस्तांनी करावं 'या' ५ फळांचं सेवन

सगळीच फळं मधुमेहींना चालतात असं नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच काही फळांची नावं सांगणार आहोत जी तुम्ही मधुमेह असताना देखील खाऊ शकता.

SHARE

१४ नोव्हेंबरला जागतिक मधुमेह दिवस साजरा करण्यात येत आहे. मधुमेह असा एक आजार आहे जो बदलत्या जीवनशैलीमुळे वेगानं फोफावत आहे. मधुमेहग्रस्तांनी वेळेत योग्य ती काळजी घेतली नाही तर याचे वाईट परिणाम भोगावे लागू शकतात. खाण्यापासून ते झोपण्यापर्यंत सर्व गोष्टींचे नियम पाळावे लागतात. रोज व्यायाम देखील करणं भाग असतं.

 सर्वात जास्त काळजी खाण्याच्या सवयींची घ्यावी लागते. फळं खायची असल्यास तुम्हाला निवडक पर्याय असतो. कारण फळांमध्ये साखरेचे प्रमाण निसर्गत: असते. त्यामुळे सगळीच फळं मधुमेहींना चालतात असं नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच काही फळांची नावं सांगणार आहोत जी तुम्ही मधुमेह असताना देखील खाऊ शकता.

) डाळिंब

डाळिंबमध्ये भरपूर प्रमाणात अॅन्टीऑक्सीडेंट्स असतात. डाळींबामुळे शरीरातील बॅड कॉलेस्ट्रॉलचा स्तर कमी करण्यास मदत होते. त्यामुळे मधुमेह काही प्रमाणात नियंत्रणात राहण्यास उपयोग होतो.

) पेरु

पेरुमध्ये फायबर असल्याच्या कारणामुळे मधुमेहात होणाऱ्या कब्जचा आजार दूर करतो. मधुमेह प्रकार 2चा धोका सुद्धा कमी होण्यास मदत होते. एवढेच नाही तर पेरुमध्ये भरपूर प्रमाणात विटामिन ए आणि विटामिन सी असते.

) सफरचंद

मधुमेही व्यक्तींसाठी सफरचंद हे उत्तम फळ आहे. सफरचंदाच्या सेवनानं एलडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी चाळीस टक्क्यांनी कमी होण्यास मदत होते. सफरचंदाच्या सेवनानं टाईप २ डायबेटीस उद्भवण्याची संभावना कमी होते. सफरचंद हे कमी ग्लायसेमिक इंडेक्स असणारे फळ आहे

) आवळा

आवळ्यामध्ये क्रोमियम असते. त्याचसोबत अॅन्टी डायबिटिक तत्व सुद्धा असल्यानं मधुमेह आजाराच्या विरोधात लढण्यासाठी आवळा फायदेशीर आहे.

) पपई

पपई हे मधुमेहासाठी फार गुणकारी ठरते. कारण यामध्ये नॅच्युरल अॅन्टीऑक्सिडेंट्स असतात. पपई शरीरात असलेल्या सेल्सला धोका पोहचण्यापासून बचाव करतात.हेही वाचा

आरोग्यासाठी आवळ्याच्या रसाचे ८ फायदे जाणून घ्या

ओव्याच्या पाण्याचे फायदे वाचून चहाला कराल टाटा-बाय-बायसंबंधित विषय
ताज्या बातम्या