Advertisement

ओव्याच्या पाण्याचे फायदे वाचून चहाला कराल टाटा-बाय-बाय

तुमचे आजी-आजोबांना या घरगुती नुस्का ट्राय करताना तुम्ही पाहिला असेलही. पण तुम्हाला चहा प्रिय ना! त्यामुळे तुमची सुरुवात चहानेच व्हायची. पण आम्ही सांगितलेले फायदे वाचून तुम्ही दिवसाची सुरुवात चहानं नाही तर ओव्याच्या पाण्यानं कराल.

ओव्याच्या पाण्याचे फायदे वाचून चहाला कराल टाटा-बाय-बाय
SHARES

सकाळी उठल्या उठल्या आपल्याला चहा लागतो. पण रिकाम्या पोटी चहा पिणं हे आरोग्यासाठी घातक आहे. पण चहाला पर्याय म्हणून तुम्ही ओव्याचे पाणी सकाळी रिकाम्यापोटी पिऊ शकता. तुमच्या आजी-आजोबांना हा घरगुती उपाय करताना तुम्ही पाहिलं असेलही. पण तुम्हाला चहा प्रिय ना! त्यामुळे तुमची सुरुवात चहानेच व्हायची. पण आम्ही सांगितलेले फायदे वाचून तुम्ही दिवसाची सुरुवात चहानं नाही तर ओव्याच्या पाण्यानं कराल.


ओवा वापरायच्या पद्धती

१) कप पाण्यात चमचाभर ओव्याचे दाणे टाकून उकळावेत. हे पाणी निम्मे होईपर्यंत आटवावे.

२) खायच्या पानामध्ये चमचाभर ओवा भरून त्याची पुरचुंडी बांधावी. तोंडात हे पान धरून ठेवा आणि त्यातून येणारा रस गिळा.


  • गॅसच्या समस्येवर गुणकारी

कधी पोट दुखत असेल की आई हमखास सांगते की ओवा खा आणि गरम पाणी पी. तिचा सल्ला काही असाच नसतो. त्याचं काही तरी महत्त्व आहेच म्हणा. ओव्यातील तेल घनस्वरुपात साठवलं जातं. त्यालाच ‘ओव्याचं फूल’ म्हणजेच ‘थायमॉल’ म्हणतात. या तेलामुळं पोटात गॅस्ट्रिक ज्यूसची निर्मिती वाढते. तसंच पचनक्रिया सुधारते. यामुळे अपचन, मळमळणे, पोटफुगी तसंच लहान मुलांमधील पोटदुखीची समस्यादेखील कमी होण्यास मदत होते. 

  • वाढत्या वजनावर फायदेशीर

शरीरातील मेटॅबॉलिझम वाढवण्याची क्षमता देखील ओव्यात आहे. त्यामुळे तुमचं वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. वजन घटवण्यासाठी केवळ कष्ट किंवा त्रासदायक डाएट फॉलो करायची गरज नाही. 

  • सर्दीपासून सुटका

पाण्यात ओवा घालून त्याची वाफ घेतल्यास सर्दीमुळे नाक, घसा चोंदणे, डोकेदुखी अशा समस्यांपासून सुटका होते. ओव्यातील बाष्पयुक्त घटक ते उकळताना किंवा त्यावर गरम करताना बाहेर पडतात. त्यामुळे वाफ घेताना ते घटक शरीरात जातात आणि चोंदलेलं नाक आणि छाती मोकळी होण्यास मदत होते. ओवा पाण्यात टाकून त्याची वाफ घेण्याऐवजी तुम्ही तो जाड मीठासोबत तव्यावर भाजून कॉटन कापडामध्ये बांधून शेक घ्या किंवा हळूहळू त्याचा वास घ्या.

  • मळमळ कमी होते

ओव्यामुळे पचन सुधारत असल्यानं मळमळणे किंवा उलटी होणे अशा समस्यांतून सुटका होण्यास मदत होते. ओव्याची वाफ घेतल्यास हा त्रास कमी होण्यास मदत होते. यामुळे उलट्या होण्याची समस्या कमी होते. ओवा हा अ‍ॅन्टिबॅक्टेरिअल असल्यानं पोटात संसर्ग निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियांची समस्या कमी होण्यास मदत होते.

  • दातदुखीवर फायदेशीर

तोंडाचे आरोग्य आणि दातदुखीची समस्या कमी करण्यासदेखील ओवा फारच गुणकारी आहे. दातदुखीची समस्या असलेल्यांनी ओव्याच्या पाण्यानं चूळ भरावी. कारण ओव्यातील थायमॉल घटक वेदना कमी करून दातांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.



हेही वाचा

आरोग्यासाठी आवळ्याच्या रसाचे ८ फायदे जाणून घ्या


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा