आरोग्यासाठी आवळ्याच्या रसाचे ८ फायदे जाणून घ्या

आवळ्याच्या रसाचे नियमित सेवन केल्यास जीवनशक्ती प्रचंड वाढते, निरोगी राहण्यास मदत होते. अशा या आवळ्याचे ८ फायदे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

SHARE

आयुर्वेदामध्ये आवळ्याचा उपयोग विविध आजारांमध्ये केला जातो. आवळा हे फळ हिवाळ्यामध्ये येत असलं तरी त्यापासून मोरावळा (मुरंबा) तयार करून तो वापरण्याची एक पद्धत आहे. आवळ्याच्या रसाचं नियमित सेवन केल्यास जीवनशक्ती प्रचंड वाढते, निरोगी राहण्यास मदत होते. अशा या आवळ्याचे ८ फायदे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

) आवळयामध्ये व्हिटामिन सी आणि अ‍ॅन्टीऑक्सिडंट याचे प्रमाण मुबलक असते. आवळ्यामुळे केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. नियमित आवळ्याचा रस प्यायल्यास केसांचे आरोग्य आणि कांती सुधारण्यास मदत होते.

) आवळ्यातील अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक त्वचा मुलायम आणि तजेलदार करायला मदत करते. तसंच एजिंगची समस्या कमी करण्यासही मदत होते.

) आवळ्यात असणाऱ्या प्रिव्हेंटीव्ह या गुणधर्मामुळे शरीरातील फ्री रॅडीकल्सचा धोका कमी होतो. अ‍ॅन्टीऑक्सिडंट आणि दाहशामक गुणधर्मामुळे कॅन्सरच्या उपचारादरम्यानही त्रास कमी करण्यास फायदेशीर ठरते.

) मेनोपॉज या जर्नलमध्ये दिलेल्या अहवालानुसार आवळा चांगल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढवून घातक कोलेस्ट्रॉल कमी करण्यास फायदेशीर ठरतं.

) आवळ्यामध्ये अनेक औषधी आणि थेरपेटीक गुणधर्म आहेत. त्यामुळे सर्दी-खोकल्याचा त्रास कमी करण्यास त्याचा नक्कीच फायदा होतो.

) २००४ साली प्रकाशित झालेल्या जर्नल ऑफ फूड अ‍ॅन्ड फंक्शनच्या अहवालानुसार आवळ्यातील गॅलिक अ‍ॅसिड आणि त्यातील अ‍ॅन्टीडायबेटीक क्षमतेमुळे प्रभावशाली ठरते. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होतं. तसंच मधूमेहातून वाढणारा हृद्यविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते.

) सेक्स लाइफ सुधारण्यासाठी आवळा फायदेशीर ठरते. त्यामधील व्हिटामिन सी घटक शुक्राणूच्या निर्मितीला चालना देतात. तसंच अधिकवेळ सेक्सचा आनंद घेण्यासाठी शरीरात उर्जा निर्मितीचं काम करतात.

) आवळ्यातील अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक तोंडातील अल्सरचा त्रास कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो.हेही वाचा -

ओव्याच्या पाण्याचे फायदे वाचून चहाला कराल टाटा-बाय-बाय
संबंधित विषय
ताज्या बातम्या