Advertisement

पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ


पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ
SHARES

मागील २ दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. मागील काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या उत्पादनात जागतिक पातळीवर घट झाली झाली होती. त्याचा परिणाम म्हणून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मागील दोन दिवसांपासून सातत्याने वाढ होत होती. त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसत होता.

राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा आजचा दर ८४.७० रुपये प्रतिलीटर आहे. तर दिल्लीच्या तुलनेत मुंबईत हाच दर ७ रुपयांनी जास्त असून ग्राहकांना पेट्रोलची खरेदी ९१.३२ रुपये प्रतीलीटरप्रमाणे करावी लागत आहे.

शुक्रवारी देखील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणातही बदल करण्यात आलेला नाही. दिल्लीमध्ये पेट्रोलचा आजचा दर ८४.७० रुपये प्रतिलीटर आहे. तर मुंबईत पेट्रोलचा दर ९१.३२ रुपये प्रतीलीटर आहे. राज्यामध्ये परभणी जिल्ह्यात पेट्रोल सर्वात महाग असून इथं पेट्रोल ९३.७३ रुपये प्रतिलीटर तर डिझेल ८२.७० रुपये प्रतिलीटरप्रमाणे विकले जातेय. बीडमध्ये पेट्रोलचा दर ८१.४० रुपये आहे. नागपुरात ९१.८२ रुपये प्रतिलीटरप्रमाणे पेट्रोल विकले जात आहे. तर डिझेलचा दर ८३.१६ रुपये प्रतिलीटर आहे. पुण्यात पेट्रोलचा दर ९१.०१ रुपये प्रतिलीटर आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पुण्यात डिझेलचा दर कमी कसून ८०.०८ रुपये प्रतिलीटर आहे.

पेट्रोलचे आजचे दर

  • आग्रा – ८४.१२ रुपये प्रतिलीटर
  • अहमदाबाद – ८४.०७ रुपये प्रतिलीटर
  • अलाहाबाद – ८४.३८ रुपये प्रतिलीटर
  • भोपाळ – ९२.५५ रुपये प्रतिलीटर
  • चेन्नई – ८७.४० रुपये प्रतिलीटर
  • मुंबई – ९१.३२ रुपये प्रतिलीटर
  • दिल्ली – ८४.७० रुपये प्रतिलीटर
  • कोलकाता – ८६.१५ रुपये प्रतिलीटर
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा