Advertisement

प्रवाशांनो इथं लक्ष द्या! आटगाव-वाशिंददरम्यान शनिवारी मध्यरात्री 'ट्रॅफिक ब्लॉक'


प्रवाशांनो इथं लक्ष द्या! आटगाव-वाशिंददरम्यान शनिवारी मध्यरात्री 'ट्रॅफिक ब्लॉक'
SHARES

शनिवारी म्हणजेच २३ डिसेंबरच्या मध्यरात्री आटगाव आणि वाशिंद स्थानकांदरम्यान अप मार्गावर 'ट्रॅफिक पॉवर ब्लॉक' घेण्यात येणार आहे. शनिवारी रात्री १൦ वाजून ५൦ मिनिटांनी हा ट्रॅफिक ब्लॉक सुरु होणार असून तो रविवारी पहाटे ४ वाजून २൦ मिनिटांपर्यंत सुरू राहील.


५.३൦ तासांचा ट्रॅफिक ब्लॉक

उड्डाणपूलांच्या गर्डरसाठी हा साडेपाच तासांचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवरील कल्याण-कसारादरम्यान आटगाव आणि वाशिंद स्थानकांदरम्यान अप मार्गावर उड्डाणपूलांचे ४ गर्डर टाकण्यासाठी शनिवारच्या मध्यरात्री ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे उपनगरीय सेवेसह अनेक लांबपल्ल्यांच्या गाड्या रद्द करण्यात अाल्या अाहेत.



सीएसटीएमवरून ८.५६ ची लोकल टिटवाळ्यापर्यंत

सीएसएमटीहून सुटणारी रात्री ८.५६ ची लोकल टिटवाळ्यापर्यंत चालवण्यात येणार आहे. तर, आसनगावहून सुटणारी रात्री ११.०८ ची ठाणे लोकल रद्द करण्यात आली आहे. तसंच लांबपल्ल्यांच्या सीएसएमटी-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस, एलटीटी-मनमाड गोदावरी एक्स्प्रेस, रद्द करण्यात आल्या आहेत.


व्हाया मनमाड-दौंडद्वारे गाड्या चालवणार

दरभंगा-एलटीटी एक्स्प्रेस,अमृतसर-सीएसटीएम, गोरखपुर-एलटीटी एक्स्प्रेस, कुशीनगर एक्स्प्रेस, शालीमार-एलटीटी एक्स्प्रेस, हावडा-सीएसटीएम, नंदीग्राम एक्स्प्रेस, अमरावती-सीएसटीएम, विदर्भ एक्स्प्रेस, देवगिरी एक्स्प्रेस पंजाब मेल, हावडा-एलटीटी, दुरांतो एक्स्प्रेस आणि मंगला एक्स्प्रेस या सर्व गाड्या एक ते सव्वा तासाच्या अंतराने नियंत्रित केल्या जाणार अाहेत. भुसावळवरून सुटणारी भुसावळ-पुणे (११०२५) एक्स्प्रेस व्हाया मनमाड-दाैंड चालवण्यात येणार आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा