Advertisement

नवी मुंबई : रस्त्याच्या कामासाठी सानपाड्यातील 'हा' मार्ग १५ फेब्रुवारीपर्यंत बंद

वाहतूक आठवडाभर बंद राहणार आहे.

नवी मुंबई : रस्त्याच्या कामासाठी सानपाड्यातील 'हा' मार्ग १५ फेब्रुवारीपर्यंत बंद
SHARES

नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) सानपाडा येथील सेक्टर 5 मधील पारसिक चौकात रस्ता काँक्रिटीकरणाचे काम हाती घेणार असल्याने पारसिक बँक चौक ते सानपाडा गावापर्यंतची वाहतूक आठवडाभर बंद राहणार आहे.

नवी मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून अधिसूचना जारी करण्यात आली असून त्यानुसार हा रस्ता १ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनचालकांना वाहतूक करण्यास मनाई करण्यात आली आहे.

मात्र, या कालावधीत वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी वाहतूक विभागाने पर्यायी मार्ग सुचवला आहे. वाहनधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि गजानन चौकाचा पर्यायी मार्ग म्हणून वापर करू शकतात. नवी मुंबई वाहतूक विभागाने वाहनधारकांना या वाहतूक बदलानुसार वाहने चालवण्याचे आवाहन केले आहे.हेही वाचा

महाराष्ट्र : दुधाच्या दरात लिटरमागे दोन रुपयांनी वाढ

Mumbai local news: बोरिवली लोकल चालवतानाच मोटरमन झाला बेशुद्ध">Mumbai Local News: बोरिवली लोकल चालवतानाच मोटरमन झाला बेशुद्ध

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा