Advertisement

विद्याविहार, नाहूर आणि दिवा स्थानकांवर लवकरच दुतर्फा प्लॅटफॉर्म

मध्य रेल्वे आणि मुंबई रेल्वे विकास महामंडळाने या तीन स्थानकांत नवे प्लॅटफॉर्म उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

विद्याविहार, नाहूर आणि दिवा स्थानकांवर लवकरच दुतर्फा प्लॅटफॉर्म
SHARES

विद्याविहार, नाहूर आणि दिवा स्थानकांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक चांगली बातमी आहे. लवकरच या स्थानकांवरील प्रवाशांना नवीन प्लॅटफॉर्म मिळणार आहेत. या प्लॅटफॉर्ममुळे प्रवाशांना फलाट क्रमांक एकवरून दोन्ही बाजूंनी लोकलमध्ये प्रवेश करता येणार आहे.

मध्य रेल्वे आणि मुंबई रेल्वे विकास महामंडळाने या तीन स्थानकांत नवे फलाट उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

विद्याविहार आणि नाहूर या दोन्ही स्थानकांत प्रत्येकी एकच फलाट आहे. या फलाटाच्या दोन्ही बाजूंनी अप आणि डाउन धीम्या लोकल धावतात. फलाट क्रमांक एकलगत रेल्वेची जागा असल्याने या स्थानकात होम फलाट उभारण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. दिवा स्थानकावरही प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरील गर्दीची विभागणी करण्यासाठी तेथेही नवे फलाट उभारण्यात येणार आहे.

दिवा स्थानकातील नव्या प्लॅटफॉर्मची लांबी २७० मीटर असून रुंदी साधारण ६ ते १० मीटर असणार आहे. या प्लॅटफॉर्मवर सरकते जिने, लिफ्ट या आधुनिक सुविधांसह अन्य सुविधादेखील पुरवण्यात येतील. या पुलासाठी अपेक्षित खर्च मंजूर झाला असून कामाचे आदेश दिल्यानंतर सहा महिन्यांत प्लॅटफॉर्म खुले करण्यात येण्याची शक्यता आहे.

दिवा स्थानकात नव्या प्लॅटफॉर्मची बांधणीसाठी ६ कोटींचा खर्च अपेक्षित असून तो मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून करणार आहे. विद्याविहार आणि नाहूर स्थानकासाठी एकूण १५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. फलाट उभारणीचे काम मध्य रेल्वे करणार आहे.



हेही वाचा

MMR ला 2023 मध्ये 11 नवीन फूट ओव्हर ब्रीज मिळणार

Mumbai Local News: 'या' लोकल गाड्यांच्या वेळेत होणार बदल

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा