Advertisement

छत्रपती शिवाजी टर्मिनसला ‘पारदर्शक’ भुयारी मार्ग


छत्रपती शिवाजी टर्मिनसला ‘पारदर्शक’ भुयारी मार्ग
SHARES

मुंबई - छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि महापालिका मुख्यालय यामधील जागेवर पर्यटकांसाठी ‘व्युईंग गॅलरी’ उभारण्याचे काम सुरू असून आता टर्मिनसच्या भुयारी मार्गाचा कायापालट करण्यात येत आहे. सध्याच्या भुयारी मार्गावरील घुमटाकार छपराऐवजी आता त्यावर चौरसाकृती पारदर्शक छप्पर बसवले जाणार आहे.

छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि महापालिका मुख्यालय हे पुरातन वास्तू श्रेणी एकमध्ये मोडत असल्यामुळे या वास्तू पाहण्यासाठी परदेशातून येणाऱ्या पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. पर्यटकांकडून याठिकाणी छायाचित्र टिपण्यासाठी होत असलेली गर्दी आणि रस्त्यावर उभे राहून छायाचित्र काढताना होणारी अपघाताची भीती लक्षात घेऊन त्याठिकाणी ‘व्युईंग गॅलरी’ उभारण्यात येत आहे. याचे काम सध्या प्रगतीपथावर सुरू आहे. मात्र, याबरोबरच छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या पुरातन वास्तूच्या क्षेत्रानुसारच याचे सुशोभिकरण केले जात आहे. त्यानुसार येथील रेलिंगचे काम सुरु आहे. 

महापालिका ए विभाग कार्यालयाच्या वतीने हे सुशोभिकरण करण्यात येत आहे. ए विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी यासाठी निविदा मागवण्यात आल्या असल्याचे सांगितले. सध्याच्या भुयारी मार्गाच्या छपराच्या जागेवर पॉलिकार्बोनेट शीट्स बसवण्यात येणार आहेत. हे छप्पर काचेचे असणार आहे. यासाठी सुमारे पावणेतीन कोटी रुपयांचा अंदाजित खर्च आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सहा महिन्यात याचे काम पूर्ण होईल, असा विश्वास दिघावकर यांनी व्यक्त केला आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा