Advertisement

कवडीमोल मजुरीवरही दरोडा


SHARES

जागेश्वरी - जागोजागी छतावरून पडणारं हे पाणी, गळतीपासून बचाव करण्यासाठी लावलेल्या बादल्या, बघाल तिथे अडगळ आणि या अडगळीत काम करणारे हे माथाडी कामगार. ही दृष्य आहेत जोगेश्वरीच्या रेल्वे यार्डमधल्या सिमेंट कंपनीजवळची. पोटाची खळगी भरण्यासाठी हे कामगार दिवसभर राबतात. पण या कामगारांना त्यांच्या हक्काचा पैसा मिळवण्यासाठीही झगडावं लागतंय. श्रमाचा योग्य मोबदला तर सोडाच पण मजुरीच्या पावत्याही गहाळ केल्या जात असल्याचा आरोप आरोप कामगार करत आहेत. मुंबई लाईव्हच्या टीमकडे या कामगारांनी त्यांच्या व्यथा मांडल्या. जर कामगारांना न्याय मिळाला नाही तर हिंदुस्थान माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार सेनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. या प्रकरणात रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी लक्ष घालण्याचीही मागणी माथाडी कामगारांनी केलीय. प्रशासन त्यांच्या समस्यांची दखल घेऊन न्याय करेल अशीच अपेक्षा या कामगारांची आहे..

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा