Advertisement

वरळी हेलिपॅड खाजगी वापरासाठी खुला होणार

दक्षिण मुंबईत सार्वजनिक हेलिपॅड नसल्याने, कोस्टल रोडलगत वरळी येथे असलेले हेलिपॅड खूप उपयुक्त ठरेल. रुग्णालयातील आपत्कालीन परिस्थितीपासून ते हेलिकॉप्टरमधून प्रवास करणाऱ्या व्हीआयपींपर्यंत आणि खाजगी ऑपरेटर्सपर्यंत, कोणीही याचा वापर करू शकते.

वरळी हेलिपॅड खाजगी वापरासाठी खुला होणार
SHARES

कोस्टल रोडलगत वरळी येथील तात्पुरत्या जेट्टीवरील प्रस्तावित हेलिपॅड हे सार्वजनिक वापरासाठी दक्षिण मुंबईतील (mumbai) पहिले सरकारकडून प्रमोट केलेले हेलिपॅड असेल.

"वरळी येथील हेलिपॅड जुहू येथील हेलिपॅडसारखेच असेल, जे खाजगी ऑपरेटर देखील वापरू शकतात. ते केवळ व्हीआयपींसाठी नसून, ते सामान्य जनतेला देखील वापरता येईल," असे राज्य सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

"ही हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीने (HCC) बांधलेली एक जेट्टी आहे आणि तिला तात्पुरती परवानगी आहे. महापालिका (bmc) हे हेलिपॅड (helipad) म्हणून वापरण्यासाठी कायमस्वरूपी जेट्टीमध्ये रूपांतरित करू इच्छिते. आम्ही पवन हंस यांची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे आणि संरचनात्मकदृष्ट्या ते शक्य आहे," असे महापालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी म्हणाले.

"आम्ही भारत सरकारच्या पर्यावरण आणि वन मंत्रालयाला मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवला आहे. मंजुरी मिळाल्यानंतर लगेचच हेलिपॅड सुविधा सुरू करण्यात येणार आहे." असे भूषण गगराणी यांनी फ्री प्रेस जर्नलला सांगितले.

कोस्टल रोडच्या बांधकामादरम्यान वरळी डेअरीजवळील जेट्टी हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीने (HCC) तात्पुरती बांधली होती. कोस्टल रोड फेज 1 पूर्ण झाल्यानंतर टाटा गार्डनजवळील जेट्टीप्रमाणेच ही जेट्टीही पाडली जाणार होती.

तथापि, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी बांधकाम जेट्टीवर हेलिपॅड उभारण्याची शक्यता तपासण्याच्या निर्देशानुसार, महापालिकेने (bmc) त्याच्या व्यवहार्यतेवर काम सुरू केले आणि आवश्यक मंजुरी मिळवली.

महापालिकेने नियुक्त केलेल्या सल्लागार पवन हंस लिमिटेड भारत सरकारच्या उपक्रमाने गेल्या महिन्यात एक सकारात्मक अहवाल सादर केला होता ज्यामध्ये असे म्हटले होते की जेट्टी हेलिपॅडमध्ये रूपांतरित करण्यासाठी संरचनात्मकदृष्ट्या शक्य आहे. त्यानंतर, हा प्रस्ताव आता मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे.

दक्षिण मुंबईत सार्वजनिक हेलिपॅड नसल्याने, कोस्टल रोडलगत वरळी येथे असलेले हेलिपॅड खूप उपयुक्त ठरेल. रुग्णालयातील आपत्कालीन परिस्थितीपासून ते हेलिकॉप्टरमधून प्रवास करणाऱ्या व्हीआयपींपर्यंत आणि खाजगी ऑपरेटर्सपर्यंत कोणीही याचा वापर करू शकते.



हेही वाचा

लोकल रेल्वेची संख्या वाढणार, रेल्वेमंत्र्यांची घोषणा

मुंब्रा दुर्घटनेनंतर दारावर बॅगा घेऊन उभे राहण्यास बंदी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा