जोगेश्वरीत धिम्या लोकलला 30 एप्रिल ते 7 मे दरम्यान थांबा नाही

  Mumbai
  जोगेश्वरीत धिम्या लोकलला 30 एप्रिल ते 7 मे दरम्यान थांबा नाही
  मुंबई  -  

  हार्बर रेल्वेचे गोरेगावपर्यंत विस्तारीकरणाचे काम सध्या सुरू आहे. त्यासाठी जोगेश्वरी येथे हार्बरचा नवा मार्ग तयार होत असल्यामुळे जोगेश्वरी स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 काढण्यात आला आहे. यामुळेच आता 30 एप्रिल ते 7 मे दरम्यान धिम्या लोकल जोगेश्वरीला थांबणार नाहीत.

  मात्र 30 एप्रिल ते 7 मेपर्यंत डहाणू, विरार, वसई, भाईंदर, बोरीवली आणि मालाडपर्यंत जाणाऱ्या सर्व जलद गाड्या जोगेश्वरीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर थांबणार आहेत. मात्र15 डब्ब्यांची लोकल आणि गोरेगाव लोकल प्लॅटफॉर्म  3 वर थांबणार नाही.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.