
राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिक्षण अधिक सुलभ व्हावे यासाठी शिष्यवृत्तीत वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय मंजूर करण्यात आला.
या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या मासिक शिष्यवृत्तीत 500 ते 1000 पर्यंत वाढ करण्यात आली आहे. यासाठी एकूण 23.11 कोटींचा खर्च मंजूर करण्यात आला आहे. यापूर्वी ही मदत केवळ 100 ते 200 इतकीच होती.
इयत्ता 9वी व 10वी (निवासी विद्यार्थी): 800
इयत्ता 9वी व 10वी (अनिवासी विद्यार्थी): 600
इयत्ता 11वी व 12वी (निवासी विद्यार्थी): 1000
इयत्ता 11वी व 12वी (अनिवासी विद्यार्थी): 800
अंध विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त भत्ता:150
शैक्षणिक सहलीसाठी (इयत्ता 11वी-12वी): वार्षिक 1500 पर्यंत मदत
या निर्णयामुळे राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अधिक आर्थिक आधार मिळणार असून त्यांच्या शिक्षणात सातत्य राखण्यास मदत होणार आहे.
हेही वाचा
