पोलिसांच्या हनी ट्रॅपमध्ये अडकला ‘सीरियल मोलेस्टर’

मुंबईत नामकिंत गाड्यांच्या शोरूममध्ये किंवा कंपनीच्या फोनवर मागील अनेक दिवसांपासून एक व्यक्ती फोनकरून महिलांशी असभ्य वर्तन करायचा. या प्रकरणी अंधेरी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. मात्र आरोपी इतका हुशार होता की, ओळख लपवण्यासाठी किंवा पोलिसांना चकवा देण्यासाठी तो `चोरीचे सिमकार्ड वापरायचा. पोलिसांनी त्याच्या गुन्ह्याची कार्यपद्धत ओळखून त्याला पकडण्यासाठी ‘हनी ट्रॅप’ लावला आणि आरोपी अलगत पोलिसांच्या जाळ्यात अडकला.   

हेही वाचाः- 'या' अभिनेत्रीच्या नावाने सोशल मिडियावर २० बनावट अकाउंट सापडले

मालाडच्या मार्वे  येथील बरोडा हाऊस येथे राहणारा हन्ड्री मायकल नाडर उर्फ विवेक हा चालक आहे. नाडर हा मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे, येथील हुंडाई मोटर्स , मोदी होंडाई , हरे कृष्णा मोटर्स, लक्ष्य अकॅडमी , फोर्ट पॉइंट , मारुती,ब्लू चिप इत्यादी कंपन्यांच्या कार्यालयांती नंबर गुगलवरुन मिळवायचा. त्यानंबरवर फोन केल्यानंतर तो फोन कुठल्या व्यक्तीने उचलल्यास तो फोन कट करायचा. मात्र फोन कुठल्या तरुणी किंवा महिलेने उचलल्यास त्याच्याशी अश्लील बोलायचा. नुकतीच अंधेरीतील एका कंपनीत त्याने अशा प्रकारे फोन करून महिलेशी गैरवर्तन केले. या प्रकऱणी महिलेने अंधेरी पोलिस ठाण्यात तीन महिन्यापूर्वी गुन्हा नोंदवला होता. पोलिसांनी तपासाला सुरूवात केली तेवढ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईत वाढला. पोलिसांनी त्याच्या नंबरच्या मदतीने सिमकार्ड वापरत असलेल्या व्यक्तीची माहिती मिळवत त्यांचे घर गाठले. मात्र चौकशीत ज्या व्यक्तींपर्यंत पोलिस पोहचले. त्यांनी स्वतःच त्याचा मोबाइल हरवल्याची तक्रार पोलिसात दिली होती. तपासादरम्यान आरोपी तीन वेगवेगळ्या चोरीच्या सिमकार्डहून हे कृत्य करत असल्याचे निदर्शनास आले.

हेही वाचाः- बनावट पासपोर्टप्रकऱणी कुख्यात गुंड एजाज लकडावालावर नवा गुन्हा

त्यामुळे आरोपीला जाळ्यात अडकवण्यासाठी अखेर पोलिसांनी ‘हनी ट्रॅप’चावापर केला.  पोलिसांनी एका मुलीला त्याच्या संपर्कात राहून त्याचा विश्वास संपादन करण्यास सांगितले. त्याला खोट्या प्रेमाचे आमीष दाखवून भेटायला बोलावले. मात्र पहिल्या भेटीत तो आलाच नाही. दुसऱ्यादा पून्हा त्या मुलीने त्याला भेटायला बोलावले. मात्र तरीही आरोपी समोर आला नाही. दोन्ही प्रयत्न फसल्याने आरोपी जाळ्यात येण्याची शक्यता धूसर होत होती. मात्र पोलिसांनी हार मानली नाही. तिसऱ्यावेळी पोलिसांनी महिलेला आरोपीला अंधेरी एमआयडीसी  परिसरातील पंपहाऊस येथे भेटण्यासाठी बोलावले. त्यावेळी आरोपी महिलेला भेटण्यासाठी आला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला. दरम्यान अंधेरी पोलिसांनी त्याच्या विरोधात ३५४ अ ३५४ ड ५०९ भादवि अन्वये गुन्हा नोंद केला असून पोलिस अधिक तपास करत होता.

पुढील बातमी
इतर बातम्या