बनावट पासपोर्टप्रकऱणी कुख्यात गुंड एजाज लकडावालावर नवा गुन्हा

बनावट कागदपत्रांच्या मदतीने तो त्याची मुलगी सानियाला परदेशात नेण्याच्या तयारीत होता. एजाजच्या भाऊ अखिलच्या अटकेनंतर मुंबईत वास्तव्यास असलेल्या एजाजच्या कुटुंबियांचा पोलिसांना थांगपत्ता लागला.

बनावट पासपोर्टप्रकऱणी कुख्यात गुंड एजाज लकडावालावर नवा गुन्हा
SHARES

कुख्यात गुंड एजाज लकडावाला यांच्यावर खंडणी विरोधीपथकाने नवा गुन्हा नोंदवून त्यात त्याचाताबा घेतला आहे. शुक्रवारी पोलिसांनी त्याता तोबा घेतला. लकडावालाने भारतातून मुलीला पलायन करण्यासाठी बनावट पासपोर्ट बनवून देण्यास मदत केल्याची तपासात उघड झाले आहे. लकडावाला विरोधात गुन्हे शाखेत सहा गुन्हे दाखल आहेत. कोरोना संकटानंतर आता गुन्हे शाखेने पुन्हा नव्या गुन्ह्यात त्याला ताबा घेतला. एजाज विरोधात हत्या, खंडणी सारख्या ८० हून अधिक तक्रारी असून मुंबईत २५ गुन्ह्यांची नोंद आहे.

हेही वाचाः- सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास अजूनही मुंबई पोलिसांकडेच- गृहमंत्री

 बनावट कागदपत्रांच्या मदतीने तो त्याची मुलगी सानियाला परदेशात नेण्याच्या तयारीत होता. एजाजच्या भाऊ अखिलच्या अटकेनंतर मुंबईत वास्तव्यास असलेल्या एजाजच्या कुटुंबियांचा पोलिसांना थांगपत्ता लागला. तपासात एजाजची मुलगी भारतातून त्याला माहिती देत असायची. त्यानुसार एजाज लकडावाला यांची मुलगी सानिया उर्फ मनीषा अडवानी (लग्नानंतरचे नाव) हिच्याविरुद्ध गुन्हा नोंदवत पोलिसांनी लूक आऊट नोटीस बजावली होती. २७ डिसेंबर २०१९ ला  सानिया आपल्या दीड वर्षाच्या मुला सोबत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नेपाळला जाणार असल्याची खात्रीलायक माहिती खंडणीविरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने तिला अटक करत तिचा ताबा मिळवला.

हेही वाचाः- महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येता कामा नये- उद्धव ठाकरे

तिच्या मोबाइल डिटेल्सनुसार ती एजाज लकडावाशी दररोज फोनवर बोलायची. लकडावाला परदेशात असताना. तो मुलीशी रात्री ३ वा. बोलायचा. मात्र भारतात आल्यानंतर भारतीय वेळेनुसार बोलू लागला. त्यावेळी पोलिसांनी एजाज भारतात आल्याचा अंदाज बांधला. मुलीच्या मोबाइलमध्ये मिळालेल्या विविध नंबरमधून तो बिहारच्या पटना येथे लपला असल्याची माहिती २७ डिसेंबर रोजी पोलिसांना मिळाली. त्यानुसार बिहार पोलिसांच्या मदतीने खंडऩी विरोधाचे पोलिस त्याच्यावर लक्ष ठेवून होते. विशेष म्हणजे भाऊ आणि मुलीच्या अटकेनंतर ही एजाज पैशांसाठी व्यावसायिकांना धमकावतच होता. ३ जानेवारी रोजी त्याने खारमधील एका व्यावसायिकाला धमकावले. पोलिसांनी त्या नंबरचा माग काढला आणि एजाजचे लोकेशन पोलिसांना कळाले. पोलिस मागावर असल्याची माहिती मिळाल्यानंतर एजाज पून्हा भारताबाहेर पळ काढण्याच्या प्रयत्नात असतानात मुंबई पोलिसांनी २३ वर्षानंतर  त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या. खंडणीच्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली होती. त्याप्रकरणी लकडावाला न्यायालयीन होता. आता कोरोना संकटनानंतर मुलीच्या बनावट पारपत्राप्रकरणी मदत केल्याप्रकरणी लकडावालाला गुन्हे शाखेने शुक्रवारी अटक केली आहे. गुन्हे शाखेकडे एजाजविरोधात सहा गुन्हे दाखल आहेत. त्यात आता एजाजचा ताबा घेऊन चौकशी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

संबंधित विषय