पोलिसांच्या हाती लागली बनावट पासपोर्ट टोळी


SHARES

अंधेरी - मुंबईच्या सहार पोलिसांनी बनावट पासपोर्टवर तरुणांना परदेशात पाठवणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केलाय. श्रीलंकेच्या तरुणांना ब्रिटनमध्ये भारतीय म्हणून पाठवण्याचा या टोळीचा डाव होता. हे करण्यासाठी या टोळीला ब्रिटीश नागरिकांचीही मदत मिळाली होती. या प्रकरणी 4 ब्रिटीश आणि 4 श्रीलंकन नागरिकांना अटक करण्यात आलीय. 

श्रीलंकन नागरिकांना लंडनमध्ये सहजासहजी घेतलं जात नाही. पण, त्यांनी आपण भारतीय असल्याचं भासवत ब्रिटनमध्ये प्रवेश करण्याचा घाट घातला. त्यासाठी सुरुवातीला 4
श्रीलंकन तरुणांनी भारतीय बनावट पासपोर्ट बनवले, जे ब्रिटीश नागरिकांच्या नावाने बनवण्यात आले. ज्यात फोटो मात्र श्रीलंकन तरुणांचे होते. 

त्यानंतर ज्या ब्रिटिश नागरिकांच्या नावाने पासपोर्ट बनवण्यात आले, ते भारतात आले. आपल्या नावाने त्यांनी या चौघाही श्रीलंकेन नागरिकांना तिकीट काढून दिली. 

या प्रकरणी एकूण आठ परदेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केलीय. तरीही एक भारतीय आणि एक श्रीलंकन दलाल अद्याप फरार आहे. सध्या त्यांचाच तपास पोलीस करत आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा