कुख्यात गुंड एजाज लकडावालाने लिहिले 'लव लेटर', पोलिसांनी केला गुन्हा दाखल

एजाज लकडावाला हा खंडणीसाठी वापरली एक वेगळी पद्धत

कुख्यात गुंड एजाज लकडावालाने लिहिले 'लव लेटर', पोलिसांनी केला गुन्हा दाखल
SHARES

खंडणीच्या गुन्ह्यात सध्या अटकेत असलेला गँगस्टर एजाज लकडावाला, तारीक परवीण आणि सलीम महाराज यांच्यावर आता पुन्हा एक गुन्हा दाखल झाला आहे. मुंबईच्या पायधुनी पोलीस ठाण्यात हा खंडणीचा गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणांमध्ये साडेसात कोटींची खंडणी मागल्याचा केल्याचा आरोप आहे. मुंबईतील एका प्रसिद्ध व्यावसायिकाने मुंबई पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार केली होती. तक्रारीनुसार आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुख्यात गँगस्टर एजाज लकडावाला याला बिहारच्या पटना येथुन मुंबई पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर चौकशीमध्ये जी नाव समोर येत गेली त्यांना सुद्धा पोलिसांनी अटक केली. यामध्ये गँगस्टर सलीम महाराज आणि तारीक परवीन यांची नाव आहेत.

मुंबई पोलिसांच्या तपासामध्ये एजाज लकडावाला हा खंडणीसाठी एक वेगळी पद्धत वापरत असल्याचं समोर आलं आहे. पायधुनी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या माहितीनुसार एजाज लकडावाला हा खंडणी उकळण्यासाठी 'लव लेटर' या सांकेतिक शब्दाचा वापर करत होता. हेच लवलेटर मुंबईतल्या एका व्यावसायिकाला तब्बल साडेसात कोटी रुपयांना पडलं होतं. एजाज लकडावालाची मोठी दहशत असल्यामुळे त्याच्याविरोधात आत्तापर्यंत कुणीही पोलिसांकडे तक्रार करत नव्हते. मात्र त्यांच्या अटकेनंतर तक्रार दाखल करण्यास आता सुरूवात झाली आहे. तीनही आरोपीबद्दल सध्या नवनवीन माहिती समोर येत असून त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले जात आहेत. अजून काही दिवसात महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा सध्या तपास करत आहेत.

याच गुन्ह्यात गुंड एजाज लकडावालाचा साथीदार तारिक प्रवीण आणि सलीम महाराज या दोघांना एका गुन्ह्यात अभय दिल्याचा आरोप वाहतूक पोलीस दलात अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण पडवळ यांच्यावर करण्यात आला आहे. या आरोपामुळे प्रवीण पडवळ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पडवळ यांनी पायधुनी पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरोधात खंडणी आणि आर्म अॅक्ट प्रकरणात त्यांना अटक न करता प्रकरण मिटवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा