आयुक्तांनी केली कुख्यात गुंड एजाज लकडावालाची कसून चौकशी

चौकशीतून गँगस्टर आणि पोलिस अधिकाऱ्यांचे असलेले संबधांची माहिती पुढे आली आहे

आयुक्तांनी केली कुख्यात गुंड एजाज लकडावालाची कसून चौकशी
SHARES
खंडणी, धमकी, हत्या, जिवे मारण्याचा प्रयत्न या सारख्या 27 गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या कुख्यात गुंड एजाज लकडावाला आणि त्याच्या साथीदारांची मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी मंगळवारी सव्वातास चौकशी केली. या चौकशीत अंडरवल्ड आणि कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याशी लागेबांधे असलेल्याची माहिती लकडावालाने आयुक्तांना दिल्याची चर्चा आहे. आयुक्तपदाची सूञे हाती घेतल्यानंतर परमबीर सिंह यांनी अंडरवर्ल्ड विरोधात फास आवण्याचे संकेत पञकार परिषदेत दिले होते.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक कुख्यात गँगस्टर एजाज लकडावाला याला मुंबई पोलिसांनी पाटणा विमानतळावरुन नुकतीच अटक केली आहे. परदेशात पळ काढणाऱ्या त्याच्या मुलीला काही दिवसांपूर्वी पोलिसांनी मुंबई विमानतळावरून अटक केली होती. तिच्या चौकशीतून लकडावाला पाटऩात लपून बसला असल्याचे कळाल्यानंतर लकडावालाच्या मुस्क्या आवळ्यात आल्या, एजाजला मुंबईत त्याचे साथीदार तारीक परवीन आणि सलीम महाराज हे मदत करत असल्याचे कळाल्यानंतर पोलिसांनी त्या दोघांना ही अटक केली. मुंबई पोलिसांच्या वॉण्टेड यादीत एजाज लकडावाला होता. 

आयुक्त परमबीर सिंह यांनी तिघांकडे केलेल्या चौकशीतून गँगस्टर आणि पोलिस अधिकाऱ्यांचे असलेले संबधांची माहिती पुढे आली आहे. एजाज लकडावालाने व्यावसायिकांना धमकावून त्यांच्याकडून खंडणी उकळण्यात काही अधिकाऱ्यांनी अस्पष्ठ मदत केल्याची कबूली तिघांनी दिली आहे. त्यामुळे आयुक्त आता या भ्रष्ठ अधिकाऱ्यांवर कशा पद्धतीने नाराजी वर्तवतात याकडे पोलिस दलाचे आणि सर्व सामान्यांचे लक्ष लागून राहलेले आहे. दरम्यान आरोपी तारीक परवीन आणि सलीम महाराज यांची न्यायालयीन तारीख असल्याने पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले असता. न्यायालयाने सलीमला 9 मार्च आणि नदीमला 13 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा