'या' अभिनेत्रीच्या नावाने सोशल मिडियावर २० बनावट अकाउंट सापडले

फॅशन, मॉडेलिंग आणि अभिनयाच्या जगतातील लोकांना शिक्षण आणि पुस्तकांमध्ये फारशी रूची नसते. मात्र ऐश्वर्याने मॉडेलिंग जगतात नाव कमावलेच मात्र अभ्यासातही ती मागे राहिली नाही.

'या' अभिनेत्रीच्या नावाने सोशल मिडियावर २० बनावट अकाउंट सापडले
SHARES

युनियन लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षेचा निकाल या आठवड्यात जाहीर केला होता. २०१९ च्या नागरी सेवा परीक्षेमध्ये ९३ वा क्रमांक मिळवलेल्या आणि मिस इंडियाच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेल्या २३ वर्षीय ऐश्वर्या शियोरनची २० बनावट खाती सोशल मिडियार असल्याची माहिती पुढे आली आहेत. या प्रकरणी तिने बनावट इंस्टाग्राम प्रोफाइल तयार केल्याबद्दल अज्ञात व्यक्तींविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचाः- महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येता कामा नये- उद्धव ठाकरे

कुलाबा पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी ऐश्वर्या शियोरन यांनी पोलिसात तक्रार  नोंदवलेली आहे. तिला सोशल मिडियावर तिच्या नावाची आणि तिच्याफोटोचा वापर करून बनवण्यात आलेली २० बनावट इंस्टाग्राम अकाउंट सापडली आहेत. ऐश्वर्या ही २०१९ च्या मिस इंडिया स्पर्धेतील अंतिम फेरी गाठले होते. मात्र तिने इंस्टाग्रामवर आपले कोणतेही खाते नसल्याचे पोलिस तक्रारीत सांगितले आहे. या प्रकऱणी कुलाबा पोलिसांनी माहिती आणि तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ (अ) अन्वये अज्ञात व्यक्तींविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचाः- अरे बापरे ! राज्यात १२ हजार ८२२ नवे रुग्ण, २७५ जणांचा दिवसभरात मृत्यू

फॅशन, मॉडेलिंग आणि अभिनयाच्या जगतातील लोकांना शिक्षण आणि पुस्तकांमध्ये फारशी रूची नसते. मात्र ऐश्वर्याने मॉडेलिंग जगतात नाव कमावलेच मात्र अभ्यासातही ती मागे राहिली नाही. ऐश्वर्या शियोरनने नुकत्याच झालेल्या यूपीएससी निकालात ९३ वा रँक मिळवून तरुणींना नवा आदर्श घालून दिला. या निकालाच्या निकालानंतरच सोशल मीडियावर ऐश्वर्याचे कौतुक करणार्‍यांची रांग लागली. मात्र काहींनी तिच्या नावाने बनावट प्रोफाईल बनवल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी आता मुंबई पोलिस अधिक तपास करत आहे.


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा