लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला डमी उमेदवार, दोघांना अटक

ज्या पदाची परिक्षा तोटेवाड पास झाला त्याचं त्याला जराही ज्ञान नव्हतं. त्यामुळं आयोगानं तोटेवाड याची चौकशी केली. या चौकशीत तोटेवाडनं बोगस उमेदवार पाठवून ही परीक्षा पास केल्याचं समोर आलं.

लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला डमी उमेदवार, दोघांना अटक
SHARES

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या लिपीक पदाच्या परिक्षेत बोगस उमेदवार बसवल्याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अकलेश भाऊलाल नागलोत आणि मनोज तोटेवाड अशी या आरोपींची नावं आहेत. या प्रकरणाचा माटुंगा पोलिस अधिक तपास करत आहेत.


७ व्या क्रमांकानं उतीर्ण

औरंगाबादचा रहिवाशी असलेल्या तोटेवाडनं ११ जून २०१७ रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची लिपीक पदाची परीक्षा दिली होती.  माटुंगाच्या एका नामांकीत शाळेत त्याचं परिक्षा केंद्र होतं. या परिक्षेत तोटेवाड अनुसुचित जाती जमाती संवर्गातून ७ व्या क्रमांकानं उतीर्ण झाला होता. त्यानुसार तोटेवाडची मुख्य कार्यालयात नियुक्ती करण्यात आली होती. मात्र वस्तुस्थिती पाहता ज्या पदाची परिक्षा तोटेवाड पास झाला त्याचं त्याला जराही ज्ञान नव्हतं. त्यामुळं आयोगानं तोटेवाड याची चौकशी केली. या चौकशीत तोटेवाडनं बोगस उमेदवार पाठवून ही परीक्षा पास केल्याचं समोर आलं. महाराष्ट्र आयोगाच्या लक्षात येऊ नये, यासाठी तोटेवाड यानं परीक्षेला बसणाऱ्या सहआरोपी अकलेशचं स्वत:च्याच नावानं बनावट खातं बनवलं होतं. तसंच, सर्व कागदपत्रांवरील सहीही त्याने केली होती. इतर कागदपत्रांचीही अशाप्रकारेच जुळवाजुळव केल्याचं निदर्शनास आल्यानंतर तोटेवाडचा पर्दाफाश झाला.


गुन्हा दाखल

या प्रकरणी तोटेवाडला २६ नोव्हेंबर २०१८ रोजी निलंबित करत, चौकशीचे आदेश दिले होते. चौकशीत तोटेवाड याचा गुन्ह्यातील सहभाग निश्चित होताच, त्याच्या विरोधात लोकसेवा आयोगानं १३ जून रोजी माटुंगा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. तोटेवाडच्या अटकेनंतर त्याच्याजागी बोगस बसलेल्या उमेदवाराचा पोलिसांनी शोध घेण्यास सुरूवात केली. त्यावेळी या गुन्ह्यात अकलेश भाऊलाल नागलोत याचा सहभाग निश्चित झाल्यानंतर पोलिसांनी त्यालाही बेड्या ठोकल्या. अकलेशच्या चौकशीत तो औरंगाबादच्या तहसील कार्यालयात पुरवठा निरीक्षक असल्याचं समोर आलं आहे.हेही वाचा -

विखे, क्षीरसागर, महातेकर यांच्या मंत्रिपदाला उच्च न्यायालयात आव्हान

प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाची कटऑफ नव्वदीपारसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा