बनावट कागदपत्रांनी सिमकार्ड खरेदी

 Chembur
बनावट कागदपत्रांनी सिमकार्ड खरेदी

चेंबूर - वत्सलाताईनगर परिसरात बनावट आधारकार्डमार्फत सिमकार्ड खरेदी करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. इम्रान शेख असं या आरोपीचं नाव आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार छापा घालून इम्रानला अटक करण्यात आली. चौकशीत आणखी तिघांची नावंही समोर आली आहेत. समीर कुरेशी, भावेश पटेल आणि मेराज खान अशी त्यांची नावं आहेत. त्यांच्याकडून विविध कंपन्यांची 75 सिमकार्ड, बनावट शिक्के असा मुद्देमालही ताब्यात घेण्यात आलाय. चौकशीदरम्यान केवळ टार्गेट पूर्ण करण्यासाठी सिमकार्ड घेतल्याचं आरोपींनी सांगितलंय. मात्र या सिमकार्डचा गैरवापर झाला असावा असा संशय पोलिसांना आहे.

Loading Comments