राज्यातील कोरोना बाधीत कैद्यांचा आकडा २ हजारच्या पार

राज्यात कोरोना ग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंतेचं वातावरण आहे. कोरोनाचे हे थैमान राज्यातील विविध कारागृहांपर्यंत पोहचले आहे. आतापर्यंत २०११ कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामधील ६ कैद्यांचा आणि ४ जेल कामकारांचा मृत्यू झाला आहे. नागपूर कारागृहमध्ये सर्वाधिक कैद्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचं समोर आलं आहे. त्यापाठोपाठ मुंबईतील आर्थर रोड कारागृहात कोरोनाग्रस्त कैद्यांचा आकडा सर्वाधिक आहे.

हेही वाचाः- IPL 2020: रायडूने धुतलं, चेन्नई विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात मुंबईचा पराभव

आर्थर रोड कारागृहात सर्वप्रथम कोरोनाचा रुग्ण सापडला होता. त्यानंतर राज्यभरातील कारागृहांमध्ये कोरोना चाचणी करण्यात आली आहे. सध्या राज्यात २०११ कैद्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती जेल प्रशासनाकडून देण्यात आली आहे. कोरोनाची बाधा झालेल्या कैद्यांना विलगीकरण कक्षात ठेवले जात आहेत. तर कैद्यांसह जैलमध्ये काम करणाऱ्या कर्मचारीही त्यापासून वाचू शकलेले नाहीत. कारागृहात काम करणाऱ्या ४१६ कर्मचाऱ्यांना आतापर्यंत कोरोनाची बाधा झाली आहे. तर ४ कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू झालेला आहे.

हेही वाचाः-ठाकरे सरकार क्वीन्स नेकलेसचं सौंदर्य का बिघडवतंय ? भाजपचा प्रश्न

यासह महाराष्ट्र पोलिस दलातील कोरोना बाधितांचा वाढता आकडा ही चिंतेचा विषय ठरलेला आहे. महाराष्ट्र पोलिस दलात आतापर्यंत २१ हजार १५२ पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली असून त्यातील १७ हजार २९५ पोलिस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच ३६४० कोरोना बाधित पोलिसांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर २१७ पोलिस कर्मचाऱ्यांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.   

पुढील बातमी
इतर बातम्या