कोरोनाबाधीत कैद्यांसाठी कारागृह प्रशासनाकडून 23 स्वतंञ 'क्वारनटाइन सेंटर'ची व्यवस्था

कोरोनोचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुढे राज्यशासनाने कारागृहातील 50% बंदी म्हणजेच एकूण 17 हजार कैदी सोडण्याचे आदेश दिले. तसेच नवीन कैद्यांसाठी कारागृहाची दारे बंद केली.

कोरोनाबाधीत कैद्यांसाठी कारागृह प्रशासनाकडून 23 स्वतंञ 'क्वारनटाइन सेंटर'ची व्यवस्था
SHARES
महाराष्ट्रात वाढलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावाने तुरूंगातील कैदी ही ञस्त आहेत. त्यामुळेच तुरुंगात कोरोना झालेल्या कैद्यांसाठी आता विशेष क्वारनटाइन सेंटर कारागृह प्रशासनाने तयार केली आहेत. तुरुंगाजवळील न वापरातल्या खासगी इमारती ताब्यात घेऊन कारागृह प्रशासनाने अशी 23 क्वारनटाइन सेंटर तयार केली असून त्यात 1101 कैद्यांना क्वारनटाइन करण्यात आले आहे. त्यात 57 महिला कैद्यांचा ही समावेश आहे.

राज्यातील कारागृहांतील क्षमतेच्या तुलनेत त्यात कैद्यांची संख्या दुप्पट होती. म्हणूनच कोरोना सारख्या संसर्गजन्य रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन न्यायालयाने 7 वर्ष शिक्षा असलेल्या 11 हजार कैद्यांना 45 दिवसांच्या जामीनावर सोडण्याचा निर्णय सुरूवातीला घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानंतर सर्व कारागृहात सामाजिक अंतर (सोशल डीस्टसिंग) ची अंमलबजावणी पहील्या दिवसांपासुन सुरू करण्यात आली. माञ कोरोनोचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुढे राज्यशासनाने कारागृहातील 50% बंदी म्हणजेच एकूण 17 हजार कैदी सोडण्याचे आदेश दिले. तसेच नवीन कैद्यांसाठी कारागृहाची दारे बंद केली.


माञ ऐवढे करून सुद्धा कारागृहात कोरोनाने शिरकाव केला. आर्थररोड कारागृहात कैद्यांसह अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर तातडीने आर्थररोडमधील कैद्यांना माहुल गाव येथे क्वारनटाइन करण्यात आले. यातून धडा घेत कारागृह प्रशासनाने कैद्यांसाठी स्वतंञ क्वारनटाइन सेंटर तयार केले. राज्यातील कारागृह विभागाने  जिल्ह्यातील खासगी इमारती ताब्यात घेऊन तब्बल 23 क्वारनटाइन सेंटर उभारली आहेत. या क्वारनटाइन सेंटरमध्ये कोरोनाची लक्षणे आढळलेल्या 1101 कैद्यांना क्वारनटाइन केलं आहे. त्यात 1044 पुरूष तर 57 महिला कैद्यांना ठेवण्यात आलेले आहे.


त्याच बरोबर कोरोना विषाणु चा संसर्ग रोखण्याकरीता राज्यातील सर्व कारागृहात प्रबोधन केले जात आहे. तसेच एका चित्रफीतीच्या माध्यमातून कोरोना संदर्भात कशा प्रकारे काळजी घ्यायची. याची ही जनजागृती केली जात आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा