Advertisement

IPL 2020: रायडूने धुतलं, चेन्नई विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात मुंबईचा पराभव


IPL 2020: रायडूने धुतलं, चेन्नई विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात मुंबईचा पराभव
SHARES

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) तेराव्या हंगामातील पहिला सामना रंगला. या सामन्यात महेंद्र सिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तसंच मुंबईनं प्रथम फलंदाजी करत चेन्नईला १६३ धावांचा आवाहन दिलं. हे आवाहन चेन्नईनं फाफ डुप्लेसिसच्या फलंदाजीच्या जोरावर पहिल्या सामन्यात विजय मिळवला.

प्रथम फलंदाजी करताना मुंबईच्या सलामीवीर रोहित शर्मा आणि क्विंटन डीकॉक यांनी संघाला चांगली सुरुवात करुन दिली. रोहितनं १० चेंडूंत १२ धावा केल्या, तर डीकॉकनं २० चेंडूंत ३३ धावा केल्या. या सामन्यात रोहित स्वस्तात बाद झाला. मात्र, त्यानंतर हे दोघे बाद झाल्यावर मुंबईची धावगती थोडीशी मंदावली. परंतु, त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या सौरभ तिवारी यानं संघाचा डाव सावरला व चेन्नई पुढे १६३ धावांचं आव्हान ठेवलं.

मुंबईनं दिलेल्या १६३ धावांचं आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली. परंतु दोन्ही सलामीचे फलंदाज स्वस्तात बाद झाले. मात्र त्यांच्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या फाफ डुप्लेसीस आणि आंबती रायडू यांनी आव्हान जीवंत ठेवण्याचा प्रयत्न केला., फाफ डुप्लेसीसनं ४४ चेंडूंत ५८ धावा केल्या व आंबती रायडू यानं ४८ चेंडूत ७१ धावा केल्या.

या सामन्यात मुंबईच्या सर्व गोलंदाजांनी प्रत्येकी १ गडी बाद केले. त्याचप्रमाणं, चेन्नईकडून लुंगी एनगीडी याने ३, दीपक चहर व रवींद्र जाडी यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. त्याशिवाय, सॅम करन व पियुष चावला यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा